Nanded Zilla Parishad Election
Nanded Zilla Parishad Election 
नांदेड

नांदेड : येळेगाव गटात काँग्रेसचे अनेक उत्सुक

लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर - तालुक्यातील तीन जिल्हा परिषद गटमध्ये खुल्या प्रवर्गासाठी एकमेव असलेल्या येळेगाव गटात काँग्रेसचे मातब्बर पदाधिकारी निवडणूक लढविण्यासाठी उत्सुक असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची उमेदवारी देताना कसोटी लागणार आहे. तर या गटातून निवडूण आलेले बबनराव बारसे पुन्हा याच गटातून निवडणूक लढवतात की ओबीसीसाठी राखीव असलेल्या मालेगाव गटात निवडणूक लढवात याकडे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे माजी उपसभापती अशोक कपाटे, संतोष कल्याणकर आदी शिवसैनिक उत्सूक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपला या गटात सक्षम उमेदवार शोधावा लागणार आहे. काँग्रेस मध्ये उमेदवारीसाठी ताणाताणी झाल्यास चव्हाण कुटुंबातील उमेदवार पुढे येवू शकतो.

येळेगाव गट खूल्या प्रवर्गासाठी राहणार असल्याने या गटातील निवडणूक उमेदवारी देण्यापासून ते निवडणूक होईपर्यंत गाजणार आहे. यात काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, काँग्रेस तालुका अध्यक्ष बालाजी गव्हाणे, भगवान तिडके, माजी सभापती आनंदराव कपाटे, भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे संचालक अॅड. सुभाषराव कल्याणकर, राजकुमार जाधव, शंकरराव टेकाळे, युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष पप्पु पाटील कोंढेकर, यांच्यासहित अनेक पदाधिकारी उत्सुक आहेत.

येळेगाव गटात गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीचा फायदा घेऊन शिवसेनेचे बबनराव बारसे सर्वांना धक्का देत विजय संपादन केला होता. शिवसेनेचे पंचायत समितीचे माजी उपसभापती अशोक कपाटे यांनी गेल्या पाच वर्षांच्या काळात या भागात चांगला संपर्क ठेवला आहे. तेही निवडणुकीसाठी उत्सुक आहेत. तसेच माजी तालुका प्रमुख संतोष कल्याणकर, माजी पंचायत समिती सदस्य बालाजी कल्याणकर, कैलास कल्याणकर, संतोष कदम आदी उत्सुक आहेत. या गटात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा उमेदवार उभे करणार आहेत. या दोन्ही पक्षाला सक्षम उमेदवार शोधावा लागणार आहे.

राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष उद्धव राजेगोरे, आत्माराम कपाटे, चंद्रकांत टेकाळे, शशिकांत क्षिरसागर आदी उत्सुक आहेत. तर भाजपचे अमोल कपाटे प्रभु कपाटे, आदी उत्सुक आहेत. या गटातील निवडणूक गाजणार असल्याने मतदार देखील निवडणूकीची वाट पाहून आहेत. या गटात काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी खुप आहेत. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना याच गटात आहे. पण अंतर्गत गटबाजीचा, उमेदवारी देवतांना होणारी ओढाताण यांसह अनेक कारणांमुळे काँग्रेसच्या विरोधातील उमेदवार निवडून येतो हे मागच्या काही निवडणुकीत दिसून आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Latest Marathi News Live Update: अमित शहांच्या एडिटेड व्हिडिओ प्रकरणी तेलंगानाच्या मुख्यंत्र्यांना समन्स

Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

SCROLL FOR NEXT