srtmou.jpg 
नांदेड

विद्यापीठात ‘या’ ऑनलाइन कोर्सेसची नोंदणी सुरू

श्याम जाधव

नवीन नांदेड ः भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयांतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘स्वयम-एनपीटीईएल’ ऑनलाइन कोर्सेससाठी ऑनलाइन नाव नोंदणी सुरू झाली असून (ता. २०) जुलैपर्यंत ऑनलाइन नाव नोंदणी करणे आवश्यक आहे, असे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

कला, वाणिज्य, व्यवस्थापनशास्त्र, विज्ञान-तंत्रज्ञान, वैद्यकीयशास्त्र, सामाजिकशास्त्र, अभियांत्रिकीच्या विविध शाखांमधील सुमारे ५३८ कोर्सेसचा स्वयम-एनपीटीईएलमध्ये अंतर्भाव आहे. या अभ्यासक्रमाला पदवी, पदव्युत्तर वर्गात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, शिक्षक, संशोधक विद्यार्थी तसेच विविध विद्याशाखांमधून शिक्षण पूर्ण करून नोकरी, व्यवसाय करत असणारे परंतु, ज्ञानार्जनात करण्याची जिज्ञासा तसेच आवड असणारी कोणतीही व्यक्ती या अभ्यासक्रमासाठी नाव नोंदणी करू शकते.

ऑनलाइन शिक्षणाची माहिती मिळण्याची संधी
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांना अनुसरून श्रेयांक हस्तांतरण प्रणाली तयार केलेली असून त्याचाही लाभ विद्यार्थी घेऊ शकतील. कोरोना विषाणूने जगभर थैमान घातलेले असताना ऑनलाइन शिक्षणाचे महत्त्व दिवसेंदिवस अधोरेखित होत असून स्वयम-एनपीटीईएल कोर्सेसच्या माध्यमातून बहुविध कोर्सेसचा खजिना सर्वांसाठी खुला आहे. यानिमित्ताने विद्यार्थी तसेच इच्छुकांना यानिमित्ताने ऑनलाइन शिक्षणाची माहिती मिळण्याची संधी असणार आहे.


‘स्वयम-एनपीटीईएल’च्या संकेतस्थळाला भेट द्यावी
स्वयम-एनपीटीईएलअंतर्गत असणारे सर्व अभ्यासक्रम पूर्णतः मोफत असून केवळ प्रमाणपत्र मिळविण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी नाममात्र शुल्क आकारले जाते. त्यसाठी ऑनलाइन अभ्यासक्रमाला २० जुलैपर्यंत ऑनलाइन नाव नोंदणी करणे आवश्यक असून नाव नोंदणी केल्याशिवाय परीक्षेचे ऑनलाइन अर्ज करण्याची संधी असणार नाही. अशा प्रकारच्या ऑनलाइन कोर्सेसच्या जागरूकतेसाठी विद्यापीठात स्वतंत्र केंद्र अस्तित्वात आहे. सदर केंद्राला एनपीटीईएल, आयआयटी, मद्रास यांच्याकडून ‘स्वयम-एनपीटीईएल लोकल चॅप्टर’ म्हणून अधिकृत मान्यतादेखील मिळाली आहे.


स्वयम-एनपीटीईएल ऑनलाइन अभ्यासक्रमाला ऑनलाइन नाव नोंदणी आणि परीक्षा अर्ज दाखल करताना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ‘स्वयम-एनपीटीईएल’ लोकल चॅप्टरचा पर्याय निवडावा. तसेच अधिक माहितीसाठी विद्यापीठ संकेतस्थळ किंवा ‘स्वयम-एनपीटीईएल’च्या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे विद्यापीठाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT