नांदेडकरांनी सोळा दिवसात साडेअकरा लाख लिटर दारु रिचवली

file photo
file photo

नांदेड : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संबंध देशभरात लावण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे सर्व व्यवहार ठप्प पडले होते. याचा सर्वाधीक फटका हातावर पोट असणाऱ्यांना बसला. राज्याला सर्वाधीक महसुल मिळवून देणारी मद्य विक्री बंद होती. परंतु ता. १६ मे पासून तीन दिवस आॅनलाईन व त्यानंतर थेट दुकानातून विक्रीला परवानगी मिळाली. अवघ्या सोळा दिवसात म्हणजेच त. ३१ मे अखेरपर्यंत जिल्ह्यात ११ लाख ४६ हजार ३३२ बल्क लिटर दारु रिचवली. यामधून शासनाला ४० कोटीचा महसुल प्राप्त झाला. 

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशात व राज्यात पाचवे लॉकडाउन सुरू आहे. या लॉकडाउनच्या काळात सर्वानांचा मोठा फटका बसला. यात सर्वाधीक त्रास झाला असेल तर हातावर पोट असणाऱ्यांना. लॉकडाउनमध्ये सर्वच व्यवहार बंद असल्याने खासगी क्षेत्रातील नोकऱ्या गेल्या. शहरात वास्तव्याला असलेले कामगार आपल्या गावी परतले. परत शहरात जाण्याची त्यांची हिंम्मत नाही. कामगार नसल्याने तिकडे उद्योग सुरू करण्यासाठी परवानगी दिली मात्र उद्योगधंद्यावाल्यांना रोजगार शोधावे लागत आहेत.


काहींच्या या सवयीसुद्धा सुटल्या

लॉकडाउनमध्ये दारुची दुकाने बंद करण्यात आली होती. त्यामुळे दारुच्या सवईचे असलेल्यांना मात्र चांगलाच घाम फुटला होता. आपल्या जवळ असलेल्या पैशातून त्यांनी काळ्या बाजारातून दारु खरेदी केली. मात्र ती दारु खिशाला परवडणारी नव्हती. लॉकडाउनमध्ये काहींच्या या सवयीसुद्धा सुटल्या. हाताला काम नसल्याने पदरमोड खर्च करणे अवघड जात असल्याने अनेकांनी आपली भाजी भाकर बरी म्हणत दारुला रामराम केला. 

सोळा दिवसात ११ लाख ४६ हजार ३३२ लिटर दारु

शेवटी राज्य सरकारने ता. १६, १७ आणि १८ मे रोजी आॅनलाईनद्वारे पार्सल सेवा सुरू केली. मात्र त्या योजनेचा बोजवारा उडाल्याने पुन्हा दारु विक्रीत बदल केला. ता. १९ मेपासून दारु दुकाने खुली करून थेट ग्राहकांना विक्री करणे सुरू केले. नांदेडकरांनी फक्त सोळा दिवसात चक्क ११ लाख ४६ हजार ३३२ लिटर दारु खरेदी केली. यात सात लाख १० हजार ५७४ लीटर देशी दारु, एक लाख ९२ हजार ७७८ लीटर विदेशी दारु, दोन लाख ३८ हजार १२४ लीटर बीअर आणि चार हजार ८५६ लीटर वाईन. गतवर्षीपेक्षा या मे महिण्यात दारु विक्री कमी झाली. 

जिल्हा दरमहा शासनाला ४० कोटी रुपये महुसल देते

नांदेड जिल्ह्यात दारु उत्पन्न करणारा कारखाना धर्मबाद येथे आहे. या ठिकाणी आर. सी., मॅकडॉल नं. १ ही दारु तयार होते. जिल्हा दरमहा शासनाला ४० कोटी रुपये महुसल देते. जिल्ह्याला महसुल वसुली उद्दीष्ट मोठे जरी असले तरी उद्दीष्टापेक्षा महसुल अधीक जमा होतो. तसेच जिल्ह्यात हातभट्टी, बनावट दारु आणि अवैध देशी विक्री करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते.
- निलेश सांगडे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नांदेड.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com