file photo 
नांदेड

नांदेडात खळबळ : कारागृह अधीक्षकांनाच शिविगाळ, मारहाण, तुरुंगाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्हा कारागृहात वरिष्ठ व कनिष्ठ असा वाद पेटला असून कारागृह अधीक्षक आणि त्यांचे अधिनस्थ अधिकारी यांच्यात कार्यालयीन कामकाजप्रकरणी चांगलाच बेबनाव झाल्याचे घडलेल्या घटनेवरुन दिसुन येते. अधीक्षकांच्या शासकिय निवासस्थानी जावून त्यांच्या कुटुंबियांसह त्यांना अश्लिल शिवीगाळ करुन धमकी देणाऱ्या दोन तुरुंगाधिकारी व एका कर्मचाऱ्यांवर वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा ती. सहा डिसेंबर रोजी दाखल झाला आहे. या घटनेनंतर तुरुंगाधिकारी मात्र पोलिसांना अद्याप सापडले नाही. 

येथील जिल्हा कारागृहात अधीक्षक म्हणून रामराजे चांदणे कार्यरत आहेत. त्यांच्यात व तुरुंगाधिकारी व अन्य कर्मचाऱ्यामध्ये मागील काही दिवसांपासून कार्यालयीन कामकाजावरुन बेबनाव होत होता. हे एकमेकांना कैचीत पकडण्याची संधी साधुन होते. शेवटी संगनमत करुन तुरंगाधिकारी उत्तरेश्वर निवृत्ती गायकवा, किशोर महादेव वारके आणि कर्मचारी सचीन शंकरराव पिंगलवार यांनी ता. पाच डिसेंबरच्या रात्री दहाच्या सुमारास कारागृह अधीक्षक श्री. चांदणे हे आपल्या निवासस्थानी परिवारासोबत गप्पा करत बसले होते. 

यावेळी रात्री दहा वाजताच्या सुमारास कारागृहातील अधिकारी उत्तरेश्वर गायकवाड, किशोर वारके व शिपाई सचिन पिंगलवार हे तिघेजण मद्याच्या धुंदीत श्री.चांदणे यांच्या घरी जावून अश्लिल भाषेत शिविगाळ केली. एवढेच नाही तर त्यांना या तिघांनी धक्काबुक्की केली. त्यानंतर तेथून निघून गेले. हा प्रकार गंभीर असल्याने श्री. चांदणे यांनी वजिराबाद पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी वरील तिघांवर विविद कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. जाधव करत आहेत. या प्रकरणामुळे कारागृहातील कैद्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Nepal Dispute: बालेन शाहांवर दबाव वाढला, तरीही शांत; पण नेपाळ सरकारने सीमा वाद मिटवण्यासाठी उचललं पाऊल

'Vaibhav Sooryavanshi ला खेळवावे की नाही, यापेक्षा...' सचिन तेंडुलकर १५ वर्षीय बॉस बेबीला कसोटीत खेळण्याबाबत नेमकं काय म्हणाला?

FIFA World Cup: "जिंका किंवा मरा!" मुसोलिनीच्या एका धमकीने कसं बदललं फुटबॉलचं मैदान? शेवटी जे घडलं ते वाचून अंगावर काटा येईल!

Kharghar Disabled girl : संतापजनक! नवी मुंबईत 17 वर्षीय दिव्यांग मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार; पीडिता चार महिन्यांची राहिली गर्भवती

CJPचा संस्थापक अभिजीत दिपके भारतात येणार, आई-वडिलांना चिंता, घर सोडून अज्ञातस्थळी

SCROLL FOR NEXT