10th fail students enter also in 10th class in belgum the decision of education department 
पश्चिम महाराष्ट्र

दहावी नापास विद्यार्थ्यांना मिळणार पूर्ण प्रवेश

मिलींद देसाई

बेळगाव : दहावी नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण खात्याने आनंदाची बातमी दिली आहे. यावर्षी पासून नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा दहावीत प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे नापास झालेल्या हजारो विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. दहावीची परीक्षा झाल्यानंतर नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी निकाल जाहीर झाल्यानंतर नापास झालेल्या विद्यार्थ्यांची दरवर्षी पुरवणी परीक्षा घेतली जाते. त्यामुळे नापास झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची संधी मिळते. 

मात्र परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना दहावीच्या वर्गात पुर्ण प्रवेश दिला जात नव्हता. यावर्षीच्या शैक्षणिक वर्षांपासून नापास झालेल्या विद्यार्थ्यांना दहावीत पुन्हा प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे एक दोन विषय शिल्लक राहिले तरी विद्यार्थ्यांना दहावीत पूर्ण प्रवेश घेताना सर्व विषय घेऊन प्रवेश घ्यावा लागणार आहे. दहावीचा निकाल लागल्यानंतर काही विद्यार्थी दहावीची पुरवणी परीक्षा देतात. मात्र पुरवणी परीक्षेनंतर ज्यादातर विद्यार्थी शिक्षणापासून दूर जातात. त्यामुळे शिक्षण खात्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी दहावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

नापास झालेल्या विद्यार्थ्यांना फक्त एकच वर्षासाठी दहावीत प्रवेश मिळणार आहे. पुन्हा प्रवेश घेऊन नापास झाल्यास त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना पुन्हा दहावीत प्रवेश दिला जाणार नाही असे शिक्षण खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. शिक्षण खात्याच्या माहितीनुसार दरवर्षी 1 लाखाहून अधिक विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत नापास होतात मात्र शाळेपासून दूर असल्याने पुरवणी परीक्षा देऊन देखील नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते, मात्र नापास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पूर्ण प्रवेश दिल्यामुळे नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. 

"नापास झालेले अनेक विद्यार्थी पुढील शिक्षणापासून दूर जात असल्याने विद्यार्थ्यांचा विचार करून दहावीत पूर्णप्रवेश दिला जाणार आहे. नवीन नियमाबाबत लवकरच शाळांना माहिती दिली जाणार आहे त्यानुसार नापास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे." 

- अण्णाप्पा पॅटी, शिक्षणाधिकारी

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत आंदोलन करणं CJPला महागात पडलं! अभिजीत दिपकेंसह सर्व आंदोलकांवर गुन्हा दाखल, पोलिसांची कडक कारवाई

Sarva Pitri Amavasya 2026: यंदा सर्वपित्री अमावस्या कधी आहे? जाणून घ्या शुभ तिथी, तर्पण मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

हल्लेखोर को-पायलटचं नाव समोर, ओमानमध्ये घातलेली बंदी; कट्टरपंथी विचारसरणीचा असल्याचंही उघड

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

Gold Silver Prices : पितृपक्षामुळे सोने-चांदीची 'झळाळी' पडली फिकी; ग्राहकांची खरेदीकडे पाठ, आता विजयादशमीची आशा, जाणून घ्या दर

SCROLL FOR NEXT