dcc sangli.jpg
dcc sangli.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यात 341 कोटीची कर्जमाफी 

सकाळवृत्तसेवा

सांगली-राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेत जिल्हा बॅंकेकडील 62 हजार 689 शेतकऱ्यांना 341 कोटी 48 लाख रूपयाचा लाभ मिळाला. संबंधित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे. तर अद्याप 2166 शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पैसे जमा होण्याची प्रतिक्षा आहे. 


महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. त्यानुसार दोन लाखापर्यंतचे शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ केले आहे. एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीत ज्या कर्ज खात्यात 30 सप्टेंबरपर्यंत अल्पमुदत पीक कर्जाची मुद्दल व व्याजासह थकीत असलेली आणि परतफेड न झालेली रक्कम दोन लाखापर्यंत आहे असे शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र होते. अशा अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना जमिन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता दोन लाखापर्यंतच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात फेब्रुवारी 2020 मध्ये शासनाने पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली होती. 


जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेत 64 हजार 855 शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यापैकी 62 हजार 689 शेतकऱ्यांच्या खात्यावर 341 कोटी 48 लाख रूपये जमा झाले आहेत. उर्वरीत 2166 शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम जमा होण्याची प्रतिक्षा लागली आहे. दोन लाखापेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची माहिती सहकार विभागाने जानेवारी महिन्यात मागवली होती. त्यामुळे त्यांना उत्सुकता होती. परंतू त्यांच्याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

कर्जमाफीची माहिती अशी : 
आटपाडी तालुका-3063 शेतकरी (17 कोटी 72 लाख रूपये), जत- 12710 (67 कोटी 64 लाख), कडेगाव- 3455 (22 कोटी 90 लाख), कवठेमहांकाळ- 7960 (36 कोटी 69 लाख), खानापूर- 3799 (20 कोटी 25 लाख), मिरज- 8809 (53 कोटी 9 लाख), पलूस- 4217 (25 कोटी 95 लाख), शिराळा- 2677 (10 कोटी 42 लाख), तासगाव- 9331 (53 कोटी 89 लाख), वाळवा- 6668 (32 कोटी 90 लाख) 

पूरग्रस्तांना 80 कोटी मिळाले- 
पूरग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने कर्जमाफी जाहीर केली होती. 105 कोटी रूपये जिल्ह्यात मिळणार होते. त्यापैकी 17 हजार 398 शेतकऱ्यांना 79 कोटी 98 लाख रूपये मिळाले. तर अद्याप 5 हजार 535 शेतकऱ्यांना 25 कोटी 25 लाख रूपये मिळण्याची प्रतिक्षा आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Latest Marathi News Live Update : नसीम खान असणार काँग्रेसचे स्टार प्रचारक

SCROLL FOR NEXT