पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूरः फुटबॉलला रेड कार्ड

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - कोल्हापूरच्या फुटबॉललाच आज रेडकार्ड देण्यात आले. फुटबॉल स्पर्धेदरम्यान शाहू स्टेडियमवर होणाऱ्या हुल्लडबाजीचा परिणाम स्थानिक फुटबॉल स्पर्धा स्थगित ठेवण्यापर्यंत येऊन ठेपला. हुल्लडबाजी, शिवीगाळ, बाटल्यांची फेकाफेक, अश्‍लील हावभाव हे नित्याचे झाले होते. रविवारी (ता. २४) झालेल्या एका स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर झालेल्या दगडफेकीच्या प्रकारानंतर कोल्हापूर स्पोर्टस्‌ असोसिएशन (केएसए)ने सर्व स्थानिक फुटबॉल स्पर्धा स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला.

बालगोपाल तालीम मंडळ आयोजित चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना काल पाटाकडील तालीम मंडळ अ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ अ या संघांदरम्यान खेळविण्यात आला होता. सामन्यानंतर समर्थकांनी प्रचंड हुल्लडबाजी करीत मैदानावर आणि मैदानाबाहेर धुडगूस घातला. दगडफेक केली. गाड्यांची मोडतोड केली. 

काही समर्थकांनी पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेत त्यांना मारहाण केली. या प्रकारामुळे काल पोलिस प्रशासनाने स्पर्धेबाबत कडक धोरण आखण्याचा निर्णय घेतला होता. यात फुटबॉल संघ, स्पर्धा संयोजक आणि ‘केएसए’ला बांधील करून घेण्याचेही जाहीर केले. आज दिवसभरात पोलिस प्रशासनाकडून हुल्लडबाजांना शोधण्याचा प्रयत्न सुरू होता; तर दुसरीकडे फुटबॉलप्रेमींत यापुढे स्पर्धा सुरू राहणार का, अशी चर्चा सुरू होती.

हुल्लडबाजांनी थेट ‘केएसए’च्या कार्यालयातील पंचांच्या खोलीत प्रवेश करीत पंचांना मारहाण केली. त्यामुळे ‘केएसए’ने हा सारा प्रकार गांभीर्याने घेत स्थानिक फुटबॉल स्पर्धा स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला. परिणामी, प्रस्तावित असणाऱ्या दोन चषक स्पर्धा होण्याचा मार्ग खडतर बनला आहे. स्पर्धांबाबत ‘केएसए’कडून निर्णय काय होईल, यावर या हंगामाचे भवितव्य अवलंबून असेल.   

यापूर्वी फुटबॉल सामन्यादरम्यान अनेकदा मैदानावर दगडफेकीचे तसेच प्लास्टिक बाटल्या फेकण्याचे प्रकार घडले आहेत. यात अनेक वेळा खेळाडूही जखमी झाले आहेत. मैदानावर समर्थकांकडून अश्‍लील शिवीगाळ तसेच अश्‍लील हावभाव करणे नित्याचे बनले आहे. सामन्यावेळी पंचांनाही शिवीगाळला सामोरे जावे लागते. हुल्लडबाज समर्थक नेहमीच पंचांना मैदानाबाहेरून शिवीगाळ करीत ‘बाहेर ये, तुला दाखवतो’ अशा चिथावणीखोर धमक्‍या देत असतात.

यापूर्वीच्या सामन्यांमध्ये हुल्लडबाज समर्थक प्रेक्षक गॅलरीच्या पहिल्या मजल्यावरून मैदानात कोसळला. यात त्याला दुखापत झाली. माध्यम प्रतिनिधींना शिवीगाळ करणे तसेच छायाचित्रकारांना मारहाण करण्यापर्यंतची मजल या हुल्लडबाजांची गेली आहे.

अंतिम सामना संपल्यानंतर हुल्लडबाजांनी पाटाकडील संघांच्या विजयी फेरी (व्हिक्‍टरी लॅप)वेळी बाटल्या फेकल्या. मैदानाबाहेरील दिवे बंद पाडून दगडफेकीला सुरवात केली. दोन्ही बाजूंनी झालेल्या दगडफेकीत अनेक दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले. अनेक समर्थक जखमीही झाले. दगडफेकीत ‘केएसए’चे पेट्रन-इन-चीफ शाहू छत्रपती महाराज यांच्या गाडीचीही नासधूस करण्यात आली. पोलिस प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेत कारवाई सुरू केली आहे.  

सुमारे अडीच हजार खेळाडूंना फटका
हुल्लडबाजीच्या या प्रकारामुळे नोंदणीकृत १२७ संघ आणि साधारण दोन हजार ५०० खेळाडूंना फटका बसला आहे. स्पर्धांचा हंगाम सध्या तेजीत असताना झालेल्या या प्रकाराने प्रस्तावित चार मोठ्या स्पर्धा होतील की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Latest Marathi News Live Update: 'नागपूर एअरपोर्ट बॉम्बने उडवू'; धमकीचा मेल आल्याने खळबळ

Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

SCROLL FOR NEXT