prithviraj patil.jpg
prithviraj patil.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

कर्नाळला जोडणाऱ्या या रस्त्यांना मंजुरी

सकाळवृत्तसेवा

सांगली-सांगली विधानसभा मतदारसंघातील कर्नाळ ते बिसूर आणि कर्नाळ ते बुधगाव या 80 लाख व 45 लाखाच्या रस्ते कामास अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली आहे. तसेच अन्य दहा कोटीचे विविध कामांचे प्रलंबित प्रस्ताव मान्यतेसाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 


ते म्हणाले, ""राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक घेतली होती. निवडणुकीत जिथे कॉंग्रेस उमेदवाराचा निसटता पराभव झाला आहे, तेथील मतदारसंघातील कामे मंत्र्यांनी प्राधान्याने करावेत अशा सूचना केल्या होत्या. सांगली मतदारसंघातील विकासकामांबाबत गेले दोन महिने पाठपुरावा सुरू होता. बिसूर, कर्नाळ, बुधगाव परिसरातील लोकांच्या मागणीनुसार रस्ते कामाबाबत प्रस्ताव पाठवले होते. त्यानुसार बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी कर्नाळ ते बिसूर आणि कर्नाळ ते बुधगाव या दोन रस्त्याच्या एक कोटी 29 लाखाच्या कामास मंजुरी दिली आहे. लवकरच प्रशासकीय मंजुरी मिळेल.'' 


श्री. पाटील पुढे म्हणाले, ""सिव्हील हॉस्पिटलच्या देखभाल दुरूस्तीसाठी तातडीने निधी मिळावा यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मंत्री चव्हाण यांनी दिले आहेत. सिव्हीलमध्ये एन्जिओग्राफी व एन्जिओप्लास्टीसाठीचे अद्यावत मशिन खरेदीस प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी प्रस्ताव दिला आहे. कार्डिओग्राफी, पॅथालॉजी, डायलेसिस, रेडिओलॉजिस्ट आदीचे तीन वर्षाचे कोर्स येथे सुरू व्हावेत यासाठी पाठपुरावा सुरू आहे. सांगली सिव्हीलमध्ये शंभर खाटांचे जनरल हॉस्पिटल आणि शंभर खाटांचे महिलांचे रूग्णालय सुरू व्हावे यासाठीचा प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित आहे. सीटी स्कॅन मशिन, स्कीन लॅब प्रस्ताव मंजुरीसाठी पाठपुरावा सुरू आहे. तसेच बामणोली या पुनर्वसित गावाला 60 वर्षे पूर्ण झाली आहेत. हिरक महोत्सवी वर्षात विकासकामासाठी साडेतीन कोटीचा निधी आवश्‍यक आहे. लोकांच्या मागणीनुसार हा निधी मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.'' 
बिसूरचे माजी सरपंच संपतराव भगत, जयकर पाटील, शहाजी पाटील आदींसह कर्नाळ, बुधगावचे नागरिक यावेळी उपस्थित होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

MI vs KKR : गोलंदाजांच्या कामगिरीवर फलंदाजांचे पाणी! IPL 2024 प्ले-ऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स बाहेर

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : मुंबई, ठाणेसह कोकणात आज उष्णतेच्या लाटेचा 'हवामान'चा इशारा

SCROLL FOR NEXT