पश्चिम महाराष्ट्र

चंद्रदीप नरकेंकडून विधानसभेची सलामी

सुनील पाटील

कोल्हापूर - जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघ मल्टिस्टेट करू नये, यासाठी सर्वच तालुक्‍यांत विरोध होत आहे. करवीर तालुक्‍यासह पन्हाळा, शाहूवाडीतूनही याला जोरदार विरोध झाला. हाच धागा पकडत आमदार चंद्रदीप नरके यांनी शेतकऱ्यांची आणि दूध उत्पादकांची बाजू घेत सत्ताधारी संचालकांसह ‘गोकुळ’च्या कारभाऱ्यांवरही टीका केली. विशेषत: करवीर विधानसभा मतदारसंघातील नरके यांचे विरोधक माजी आमदार पी. एन. पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवत करवीर विधानसभा निवडणुकीसाठीची सलामी दिली आहे.

गोकुळ मल्टिस्टेट होऊ नये, यासाठी करवीरमधूनही याला जोरदार विरोध होत आहे. यासाठी हाच विरोध तीव्र करण्यासाठी आमदार नरके यांनी काल (ता. १६) कळंबा (ता. करवीर) येथे दूध उत्पादकांची बैठक घेतली. सभेत बोलणाऱ्या प्रत्येकाने पोटतिडकीने भूमिका मांडत गोकुळ मल्टिस्टेट होऊ नये, यासाठी आग्रह धरला. ‘गोकुळ’मध्ये माजी आमदार महादेवराव महाडिक आणि माजी आमदार पाटील यांचे नेतृत्व आहे. लोकांचा विरोध होत असतानाही ‘गोकुळ’चे कारभारी हा ठराव रेटत असल्याची टीकाही करण्यात आली. 

‘गोकुळ’मध्ये दोन नंबरच्या कारभाऱ्यांचे सहा संचालक आहेत. तरीही, ते दूध दराबाबत बोलत नाहीत किंवा गोकुळ मल्टिस्टेट होऊ नये, यासाठी आपली भूमिका स्पष्ट करीत नाहीत, अशी टीका करून श्री. पाटील यांना निष्क्रिय दाखविण्याचा प्रयत्न आमदार नरके यांनी केला. एवढेच नव्हे, तर नरके अध्यक्ष असणाऱ्या कुंभी-कासारी साखर कारखान्यातील ऊस उत्पादकांना ‘एफआरपी’नुसार दर मिळाला पाहिजे, म्हणून श्री. पाटील यांचे कार्यकर्ते नरके यांच्या मागे हात धुवून लागले आहेत. आता ‘गोकुळ’मध्येही हेच शेतकरी दूध उत्पादक आहेत. त्यांच्यासाठी पी. एन. पाटील त्यांच्या हिताची भूमिका घेत नसल्याचीही टीका नरके यांच्याकडून होत आहे.  

कारखान्याला कितीही तोटा झाला, तरीही कर्ज काढून ऊस उत्पादकांचे पैसे भागविणार असल्याची जाहीर भूमिका नरके यांनी घेतली आहे. मात्र, गोकुळ दूध संघ मल्टिस्टेट करू नये, यासाठी जिल्ह्यातील सभासद आणि दूध उत्पादक मागणी करीत आहेत. संचालकांच्या संपर्क सभेत जाहीर विरोध करीत आहेत. तसेच, शासनाने गायीच्या दूध दरासाठी प्रतिलिटर २७ रुपये दर देण्याचे जाहीर करूनही त्यांना केवळ २२ ते २३ रुपयेच दर दिला जात आहे. ‘गोकुळ’मध्ये दूध उत्पादकांची लूट केली जात आहे, तरीही ‘गोकुळ’मधील दोन नंबरचे कारभारी मूग गिळून गप्प का? असा सवाल श्री. पाटील यांचे नाव न घेता केला आहे. 

उत्तर द्यावे लागणार
दूध दर आणि गोकुळ मल्टिस्टेट या दोन ज्वलंत व दूध उत्पादकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नांवरून श्री. पाटील यांना कोंडीत पकडले आहे. उसाला सरकार सांगेल तेवढा आम्ही दर देणार आहे, मग ‘गोकुळ’ला सरकारने सांगितलेला दर का दिला जात नाही..? या श्री. नरके यांच्या प्रश्‍नाचे उत्तर मात्र पाटील यांना द्यावे लागणार आहे. यापुढे जाऊन नरके यांनी ‘गोकुळ’च्या वार्षिक सभेत आपला सक्रिय सहभाग असेल, तसेच सभासदांच्या प्रश्‍नांची उत्तरे संचालकांना द्यावी लागतील, असा आग्रहही धरला आहे. त्यामुळे संचालकांनाही शांततेत उत्तरे द्यावी लागणार आहेत. सभा शांततेत झाली नाही किंवा सभासदांच्या प्रश्‍नांची उत्तरे न देता सभा गुंडाळली तर मात्र ‘गोकुळ’ कारभाऱ्यांना टिकेला सामोरे जावे लागणार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

SCROLL FOR NEXT