Belgaum-Pune Flight Services esakal
पश्चिम महाराष्ट्र

Flight Services : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' कारणामुळं बेळगाव-पुणे विमानसेवा बंद

बेळगाव-पुणे दरम्यान प्रवास करण्याची संख्या ही मोठी आहे.

सकाळ डिजिटल टीम

बेळगाव शहरातून सद्य:स्थितीत देशातील ११ शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे.

बेळगाव : बेळगाव-पुणे विमानसेवेला (Belgaum-Pune Flight Services) मागणी असूनही ही विमानसेवा अनेक महिन्यांपासून बंदच आहे. बेळगावातून विमानाने पुणे प्रवास करणाऱ्यांना अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. काही तांत्रिक कारणांमुळे ही विमानसेवा लटकली आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन ही विमानसेवा सुरू करण्यासाठी हालचाली कराव्यात, अशी मागणी होत आहे.

बेळगावातून सध्या स्टार एअर (Star Air) व इंडिगोच्या विमानसेवा (Indigo Airlines) आहेत. यापूर्वी अलाईन्स एअरलाईन्सची बेळगाव-पुणे ही विमानसेवा होती. मात्र, या कंपनीने येथील सर्वच विमानसेवा स्थगित केल्यानंतर येथील विमानसेवा बंद झाली आहे. पुणे विमानतळावरून परवानगी व वेळापत्रकाचे नियोजन करताना अडचणी येत असल्यामुळे ही विमानसेवा बंद आहे.

सप्टेंबरमध्ये बेळगाव-दिल्ली विमानसेवेची (Belgaum-Delhi Flight) घोषणा झाली. त्याचवेळी बेळगाव-पुण्‍याचीही घोषणा झाली होती. पुण्याची विमानसेवाही ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान सुरू केली जाणार होती. मात्र, तीन ते चार महिन्यांनंतरही ही विमानसेवा सुरू झालेली नाही. सद्य:स्थितीत महत्त्वाच्या शहरांना विमानसेवा जोडली तरी बऱ्याचशा ठिकाणी विमानसेवा सुरू होणे आवश्यक आहे.

बेळगाव-पुणे दरम्यान प्रवास करण्याची संख्या ही मोठी आहे. त्यामुळे बेळगाव-पुणे ही विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली जात आहे. बेळगाव शहरातून सद्य:स्थितीत देशातील ११ शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. अहमदाबाद, इंदूर, जोधपूर, मुंबई, तिरुपती, सुरत, बंगळूर, हैद्राबाद, नागपूर, जयपूर व दिल्ली या ठिकाणी विमानसेवा सुरू आहेत. इंडिगो व स्टार एअर कंपन्यांमार्फत विमानसेवा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत.

बेळगाव-पुणे विमानसेवा सुरू करण्याला प्राधान्य दिले आहे. बेळगाव विमानतळावरून कोणतीही अडचण नाही. मात्र, पुणे विमानतळावरून परवानगी मिळत नसल्याने विमानसेवा बंद आहे. मार्चनंतर ही विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

-एस. त्यागराजन, संचालक, सांबरा विमानतळ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: नागपुरात १०० एकरवर ‘पल्स प्रोटिन पार्क’; ५०० कोटींच्या गुंतवणुकीला मुख्यमंत्र्यांची मंजुरी

Successful Kidney Transplant: पतीच्या नवजीवनासाठी पत्नीचा त्याग! हसीना शेख यांनी किडनी दान करून अस्लम यांना दिले जीवनदान, त्यागाची भावस्पर्शी कहाणी..

Latest Marathi News Live Update : दक्षिण चेन्नईतील अनेक निवासी भागांत मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचले

Majalgaon Telgaon Road Accident : माजलगावजवळ एसटी बस आणि कारची भीषण धडक; पाच जणांचा जागीच मृत्यू, तुळजापूरला देवीच्या दर्शनला निघाले पण...

Kolhapur Mangav Murder Case : मंदिरातून परतताना अल्पवयीन मुलगीचा धारदार शस्त्राने खून, कोल्हापुरातील माणगाव धक्कादायक घटना; आरोपीचा अद्यापही शोध नाही

SCROLL FOR NEXT