Pearl Farming : आता शिवाजी विद्यापीठात पिकणार 'मोती'; प्राणीशास्त्र अधिविभागानं घेतला पुढाकार

ही मोत्यांची शेती विद्यापीठ पैशांसाठी करीत नसून ज्ञानसंवर्धनासाठी करीत आहे.
Pearl Farming Shivaji University
Pearl Farming Shivaji Universityesakal
Published on
Summary

गोड्या पाण्यातील मोत्यांच्या उत्पादन व संशोधनाचे केंद्र हे या मालिकेतील महत्त्वाचे पाऊल आहे.

कोल्हापूर : अभिनव आणि नवोन्मेषी उपक्रमांना सातत्याने पाठबळ देणारे शिवाजी विद्यापीठ (Shivaji University) आता खऱ्याखुऱ्या मोत्यांची शेती (Pearl Farming) पिकविण्यास सिद्ध झाले आहे. विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अधिविभागाने घेतलेल्या पुढाकारातून गोड्या पाण्यातील मोती संवर्धन, संशोधन आणि उत्पादन केंद्राचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

कुलगुरू डॉ. शिर्के यांना सडोली दुमाला येथील मोती उत्पादक व प्रशिक्षक दिलीप कांबळे यांच्याविषयी माहिती समजल्यानंतर त्यांनी प्राणीशास्त्र अधिविभागाला त्यांच्याशी संपर्क साधून अशा प्रकारचे प्रशिक्षण केंद्र विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी उभारण्याविषयी चाचपणी करण्याची सूचना केली होती. त्यानुसार आज विद्यापीठात हे मोती पिकविणारे केंद्र श्री. कांबळे यांच्याच सहकार्यातून उभे राहिले आहे. विभागातील प्राणीशास्त्रज्ञ डॉ. नितीन कांबळे हे त्याचे समन्वयक म्हणून काम पाहात आहेत.

Pearl Farming Shivaji University
Kavi Keshavsut : कवी केशवसुतांचे मालगुंड 'पुस्तकांचे गाव' कधी बनणार? भिलारसह कोकणातील गावांना मिळालाय हा सन्मान

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, ‘प्राणीशास्त्र विभागातील रेशीमशेतीचा ‘सॉईल टू सिल्क’ प्रकल्प, फुलपाखरू उद्यान आणि अलिकडच्या काळात सुरू केलेला शोभेच्या मत्स्यउत्पादनाचा प्रकल्प ही याची काही उदाहरणे आहेत. आपल्या विभागातील विद्यार्थी आणि नागरिक यांना सगळे समुद्रीजीव एकाच ठिकाणी पाहता येतील, अशा पद्धतीचे भव्य मत्स्यालय उभारण्याचा मनोदय आहे. आज कार्यान्वित करण्यात आलेले गोड्या पाण्यातील मोत्यांच्या उत्पादन व संशोधनाचे केंद्र हे या मालिकेतील महत्त्वाचे पाऊल आहे.

Pearl Farming Shivaji University
'मविआ'त कोल्हापूरसह राज्यातील 'या' चार जागांचा तिढा कायम; शाहू छत्रपती महाराजांचं नाव निश्‍चित होण्याची शक्यता!

ही मोत्यांची शेती विद्यापीठ पैशांसाठी करीत नसून ज्ञानसंवर्धनासाठी करीत आहे. पर्ल फार्मिंग या विषयाचा आपल्या अभ्यासक्रमात समावेश करावा आणि किमान दर वर्षी काही उद्योजक (Business), व्यावसायिक आपल्या विद्यार्थ्यांमधून निर्माण व्हावेत, अशा प्रकारे त्यांना प्रशिक्षित करावे.’ यावेळी अधिविभाग प्रमुख डॉ. आशिष देशमुख, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार, डॉ. एस.आर. यन्कंची, माधुरी वाळवेकर, सुनील गायकवाड उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nagpur News
Two Decades of Consistent Ridge Gourd Cultivation
116-Year-Old Legacy Revived as Renovation Work Starts on Shivaji Takht
Chhatrapati Sambhajinagar
Marathi News Esakal
www.esakal.com