Bill of 40; 170 paid; tiles scam in Sangli Zilla Parishad
Bill of 40; 170 paid; tiles scam in Sangli Zilla Parishad 
पश्चिम महाराष्ट्र

40चे बिल; 170 आदा; सांगली जिल्हा परिषदेत फरशी घोटाळा

अजित झळके

सांगली ः जिल्हा परिषद मुख्यालयाच्या नूतनीकरणात फरशी घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. 28 रुपये किमतीची फरशी मजुरीसह बसवण्याचा खर्च 40 रुपये चौरस फूट अपेक्षित असताना ठेकेदारांना 170 रुपये चौरस फुटाने बिल आदा करण्यात आले. रंगरंगोटीपासून सर्वच कामांत जादा पैसे आदा करण्यात आलेत. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी 90 लाखांच्या या कामाची फाईल उघडली असून, पंचनामा सुरू झाला आहे. 

जिल्हा परिषद इमारतीचे गेल्यावर्षी नूतनीकरण झाले. तळातील फरशा बदलल्या. जिन्याच्या पायऱ्यांवर नवीन फरशा आल्या. भिंतीला उभ्या फरशा चिकटवल्या. रंगरंगोटी झाली. हे काम सुमारे 90 लाख रुपयांचे. दोन मजूर सोसायट्यांकडे ठेका होता. बिलेही आदा करण्यात आलीत. त्याविषयी काही शंका उपस्थित झाल्यानंतर गुडेवार यांनी आदा केलेली बिले, फरशीचा बाजारातील दर, प्रत्यक्ष फरशी बसवण्याचा दर हे तपासून घेतले. त्यातून हा गंभीर प्रकार समोर आला आहे. 

श्री. गुडेवार यांनी प्रत्यक्षात फरशी ज्या दुकानातून खरेदी केली, त्या दुकानाला भेट दिली. तेथे त्याच फरशीचा दर विचारला. थोडा पाडून मागितला. दुकानदाराने 28 रुपये चौरस फुटाने फरशी देण्याची तयारी दर्शवली. फरशी बसवण्याचा खर्च 40 रुपयांपर्यंत येणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ठेकेदाराला 170 रुपये चौरस फुटाने बिल आदा करण्यात आले. 

वास्तविक, या ठेकेदार संस्थेने खरेदी केलेल्या बिलांच्या प्रती श्री. गुडेवार यांनी मागवल्या आहेत. त्यात ही फरशी 28 रुपये दरानेच खरेदी केल्याचेही स्पष्ट दिसत आहे. असे असताना तब्बल चौपटीहून अधिक दराने बिले आदा केल्याने यातील घोटाळा समोर आला आहे. आता प्रत्येक कामाची बारकाईने चौकशी केली जाणार आहे. या घोटाळ्यात पदाधिकारी, अधिकारी आणि ठेकेदार यापैकी कुणाचा किती सहभाग आहे, याचीही चौकशी होईल. 

पडताळणी करून कार्यवाही

जिल्हा परिषद इमारतीच्या नूतनीकरणाची संपूर्ण चौकशी सुरू केली आहे. काही गंभीर गोष्टी समोर आल्या आहेत. संपूर्ण पडताळणी करून कार्यवाही केली जाईल. 
- चंद्रकांत गुडेवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी 

संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT