Congress BJP
Congress BJP  esakal
पश्चिम महाराष्ट्र

Karnataka Election : भाजप-काँग्रेसमध्येच काँटे की टक्कर!

सकाळ वृत्तसेवा

गेल्या तीन दशकांपासून कागवाड विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा जनता दल, तीन वेळा भाजप, पुन्हा काँग्रेस, आता भाजप उमेदवारांनी विधानसभेचे प्रतिनिधित्व केले आहे. सध्याचे विद्यमान आमदार भाजपचे श्रीमंत पाटील तर माजी आमदार व काँग्रेसचे उमेदवार भरमगौडा ऊर्फ राजू कागे हे दोन्ही उमेदवार राष्ट्रीय पक्षातून निवडणूक लढविणार, हे निश्चित आहे.

मात्र, भाजपकडून उमेदवारीची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. तरीही त्यांना पक्षात कोणी आव्हान दिले नसल्याने त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रचाराला या मतदारसंघात प्रारंभ झाला आहे.

पाणी योजना केंद्रबिंदू

कागवाड मतदारसंघातील उत्तर भागासाठी वरदान ठरलेल्या बसवेश्वर जलसिंचन योजनेच्या पूर्णत्वासाठी आमदार श्रीमंत पाटील यांनी प्रयत्न केले. तर काँग्रेस उमेदवार राजू कागे हे ही योजना काँग्रेस काळातच मंजूर झाल्याचे विविध सभांतून दावा करत आहेत. एकूणच कागवाड विधानसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच लढत होणार आहे.

दोन्ही नेत्यांमध्ये २०१८ मध्ये आणि पक्षांतरामुळे २०१९ मध्ये येथे पोटनिवडणूक झाली. तेव्हापासून येथील राजकीय समीकरणे बदलत गेली. नेत्यांच्या पक्ष बदलामुळे कार्यकर्त्यांची इकडून तिकडे मोठे उलथापालथ झाली आहे. माजी आमदार राजू कागे जनता दलातून एकदा, तर भाजपातून तीन वेळा विजयी झाले आहेत.

तर विद्यमान आमदार श्रीमंत पाटील २०१८ मध्ये काँग्रेस पक्षातून पहिल्यांदा निवडून आले होते. मात्र, वर्षभरातच काँग्रेस सोडून भाजपत आल्याने २०१९ च्या पोटनिवडणुकीत पुन्हा विजय संपादन करून मंत्रिपदही मिळविण्यात ते यशस्वी झाले. चाळीस वर्षांनंतर या मतदारसंघाला मंत्रिपदाचे स्थान मिळाले.

द्विसदस्यीय ते एकसदस्यीय

कागवाड विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. या मतदारसंघातून आतापर्यंत विविध पक्षांचे उमेदवार विजयी झाले आहेत. या मतदारसंघातून निवडून आलेल्या आमदारांना मंत्रिपदही मिळाले आहे. १९५७ मध्ये रायबाग मतदारसंघात हा भाग समाविष्ट होता.

त्यावेळी द्विसदस्यीय सदस्यांमुळे व्ही. एल. पाटील अपक्ष आणि एस. पी. तळवळकर यांनी एससीएफमधून आमदारकी मिळविली होती. १९६२ पासून कागवाड मतदारसंघात एक सदस्यीय सदस्यासाठी निवडणूक सुरू झाली. त्यावेळी एस. व्ही. पाटील काँग्रेसकडून विजयी झाले होते. या मतदारसंघात वारंवार आमदार बदलत गेले आहेत. केवळ राजू कागे यांनी चारवेळा येथे विजय मिळविला आहे. २०१८ मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

मतदारसंघात चारवेळा मंत्रिपद

कागवाड मतदारसंघाने आतापर्यंत चारवेळा मंत्रिपद मिळविले आहे. १९७२ मध्ये आर. डी. कित्तूर यांच्या रुपाने पहिले मंत्रिपद मिळाले. त्यानंतर लागलीच ए. बी. जकनूर हे १९७८ ला मंत्री झाले. रायबाग भागात असलेल्या व कागवाड भागातून आमदार झालेल्या व्ही. एल. पाटील यांना १९८३ मध्ये मंत्रिपदाची संधी मिळाली.

सलग तीन विधानसभा निवडणुकीनंतर या मतदारसंघात मंत्रिपद मिळत गेले होते. त्यानंतर हा टप्पा ३६ वर्षांनी पार करता आला. श्रीमंत पाटील यांच्या पोटनिवडणुकीतील विजयाने काहीकाळ त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली. सध्या ते आमदार असून पुन्हा रिंगणात उतरणार आहेत.

एकूण मतदार

  • एकूण मतदार ः १,९१,०५०

  • पुरुष मतदार ः ९७,७०७

  • महिला मतदार ः ९३,३१४

कागवाड मतदारसंघातील आमदार असे

साल - आमदार

१९६२ - एस. व्ही. पाटील (काँग्रेस)

१९६७ - चंपाबाई भोगले (काँग्रेस)

१९८२ - आर. डी. कित्तूर (काँग्रेस)

१९७८- ए. बी. जकनूर (काँग्रेस)

१९८३- व्ही. एल. पाटील (जनता दल)

१९८५- व्ही. एल. पाटील (जनता दल)

१९८९- ए. बी. जकनूर (काँग्रेस)

१९९४- मोहन शहा (जनता दल)

१९९९- पासगौडा पाटील (काँग्रेस)

२०००- राजू कागे (पोटनिवडणूक) (संयुक्त जनता दल)

२००४- राजू कागे (भाजप)

२००८- राजू कागे (भाजप)

२०१३- राजू कागे (भाजप)

२०१८- श्रीमंत पाटील (काँग्रेस)

२०१९- श्रीमंत पाटील (पोटनिवडणूक) (भाजप)

कागवाड विधानसभा मतदारसंघ म्हणजे स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचाच बालेकिल्ला होता. काँग्रेसपाठोपाठ जनता दल, त्यानंतर भाजप असे प्रादेशिक व राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांनी येथून विधानसभेत प्रतिनिधीत्व केले आहे. एकीकडे दुष्काळ तर दुसरीकडे कृष्णा नदीचे वरदान असे काही वर्षांपूर्वीचे चित्र आता बदलले आहे. दुष्काळी भागही आता खासगी, सरकारी पाणी योजनांमुळे हळूहळू बागायत होत आहे.

- संजय काटकर, रंगनाथ देशिंगकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: सुनील टिंगरे चौकशीसाठी तयार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT