Chandoli Dam Closed For Tourists Sangli Marathi News
Chandoli Dam Closed For Tourists Sangli Marathi News 
पश्चिम महाराष्ट्र

चांदोली धरण उद्या पर्यटकांसाठी बंद ...

सकाळ वृत्तसेवा

वारणावती (सांगली) : शिराळा तालुक्‍यातील चांदोली धरण रविवारी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पर्यटकांसाठी बंद राहणार असल्याचे धरण प्रशासनाने कळवले आहे.

चांदोली धरण 34.40 टिएमसी पाणी साठवण क्षमता असणारे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे मातीचे धरण आहे. सध्या धरणात 29.81 टिएमसी पाणीसाठा असुन, धरण 86.63 टक्के भरले आहे. दर गुरुवारी व शासकीय सुट्टी दिवशी धरण पाहण्याचा परवाना मिळणार नसल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. 


चांदोली उद्यान सहा दिवस बंद 

वन्य प्राणी गणना होणार असल्याने चांदोली राष्ट्रीय उद्यान 27 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या दरम्यान सहा दिवस बंद राहणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल गोविंद लंगोट व वनपाल डी. के. यमगर यांनी दिली. यावेळी ते म्हणाले, वन्यजीव प्राणीगणनेची तयारी पूर्ण झाली असूनण 27 ते 29 जानेवारी पर्यत बीटामध्ये, तर 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या तीन दिवसांत ट्रानसेकेट लाईन पद्धतीने गणना करण्यात येणार आहे. 2 फेब्रुवारीपासून नेहमीप्रमाणे उद्यान पर्यटकांना खुले राहणार आहे. यावेळी वनपाल डी. बी. महाडिक उपस्थित होते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Home Loan: RBIने जाहीर केली गृहकर्जाची धक्कादायक आकडेवारी; गेल्या 2 वर्षात झाली 10 लाख कोटी रुपयांची वाढ

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Latest Marathi News Update : पुण्यात मेट्रोच्या प्रवाशांमध्ये वाढ, एप्रिलमध्ये दिवसाला सरासरी 80 हजार जणांचा प्रवास

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

SCROLL FOR NEXT