karhad
karhad 
पश्चिम महाराष्ट्र

ओगलेवाडी पाझर तलावात महाविद्यालयीन तरुणाची आत्महत्या 

सकाळवृत्तसेवा

ओगलेवाडी (ता. कऱ्हाड) - राजमाची (ता. कऱ्हाड) येथील दरा नावाच्या शिवारातील पाझर तलावात उडी टाकून एका महाविद्यालयीन तरुणाने आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली. कुणाल सोपान गुंजाळ (वय १८, रा. आडगाव- रेपाळ ता. येवला, जि.नाशिक) असे संबंधित तरुणाचे नाव आहे. राजमाचीच्या दादासाहेब मोकाशी अन्न व तंत्रज्ञान महाविद्यालयात तो प्रथम वर्षात शिकत होता.

घटनास्थळावर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. आत्महत्येच्या घटनेने परिसरात खळबळ निर्माण झाली. घटनेची सर्वत्र चर्चा होती. कुणाल महाविद्यालयाच्या वसतीगृहात राहात होता. वसतीगृहातील प्रमुखांनी काल रात्री हजेरी घेतली असताना तो अनुपस्थित असल्याचे आढळले. त्यामुळे रात्री नऊ वाजल्यापासून त्याची शोधाशोध सुरू होती. आज सकाळी वसतीगृहातील त्यांच्या खोलीत त्याचा मोबाईल मिळाला. त्यामध्ये मी न आढळल्यास माझा जवळच्या तलावात शोध घ्यावा, असा मजकूर मोबाईल मध्ये आढळला. मोबाईलवरील मजकुरावरून त्याचा तलावात शोध घेण्यात आला. तलावातील पाण्यात त्याचा मृतदेह आढळला. कुणालच्या नातेवाईकांनी घटनेची माहिती मिळताच ते तेथे दाखल झाले होते. त्यांना कुणालच्या आत्महत्येमुळे दुःख आवरत नव्हते. त्याची घरची परिस्थिती गरीबीची आहे. त्याचे पालक म्हणाले, आम्ही दुष्काळी पट्यातील येवले (नाशिक) जवळ राहणारे आहोत. दुष्काळामुळे थोडी असलेली शेती पिकत नाही. तरीही त्याला इंजिनिअरिंगचे उच्च शिक्षण देण्याची आमची इच्छा होती. 1 तारखेस त्याची परिक्षा होती. त्यापूर्वी पैसे गोळा करून फी भरण्याची आम्ही तयारी करत होतो. पण त्यापूर्वीच ही दुर्दैवी घटना घडल्याने आम्ही सर्व व्यथीत झालो, असे त्यांनी जड अंतःकरणाने सांगितले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार यु. जी. खराडे तपास करत आहेत. हर्षद बाळासाहेब कांबळे यांनी घटनेची खबर दिली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: मुंबई आग्रा चांदवड मार्गावर भीषण अपघात; ६ ते ७ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Loksabha Election 2024 : शांतीगिरी महाराजांमुळे तिढा वाढला ; नाशिकमध्ये शिवसेनेकडून अर्ज सादर केल्याचा दावा

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Latest Marathi News Live Update : बाणेर-पाषाण रोडवर ट्रॅफिक जाम.. वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT