Curruption
Curruption 
पश्चिम महाराष्ट्र

धक्कादायक... अनुदान काढण्यासाठी कृषी कार्यालयाने काय मागितले पाहा

अण्णा काळे

करमाळा (सोलापूर) : पिंपळवाडी (ता. करमाळा) येथील शेतकऱ्याला रोजगार हमी योजनेतून लावलेल्या लिंबूच्या बागेचे बिल काढण्यासाठी कृषी सहाय्यकाने पैसे मागितले असल्याची तक्रार पिंपळवाडी येथील आदिनाथ हंबीरराव काळे यांनी मुख्यमंत्री, कृषिमंत्री, रोजगारहमी मंत्री व कृषी अधीक्षक, सोलापूर यांच्याकडे केली आहे.

दोन वर्षे होऊन गेली तरी मिळाले नाही बिल
या प्रकारामुळे करमाळा कृषी विभागाचा अनागोंदी कारभार समोर आला आहे. पिंपळवाडी येथील आदिनाथ हंबीरराव काळे यांनी 2017 मध्ये महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागामार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत दीड एकरावर लिंबूच्या झाडांची लागवड केली होती. दोन वर्षे उलटून गेली तरी या शेतकऱ्याला अद्याप अनुदान मिळाले नाही. अनुदानाच्या बिलासाठी या शेतकऱ्याने वारंवार मागणी केली. यासाठी करमाळा कृषी कार्यालयात अनेक वेळा फेऱ्या मारल्या; मात्र बिल मिळाले नाही. त्याचे पहिले बिल 30 जानेवारी 2018 रोजी आठ हजार 442 रुपये मिळाले. परंतु बाकीचे राहिलेले 65 हजार 365 रुपये बिल दोन वर्षे होऊन गेली तरी अद्याप मिळाले नाही. याबाबत या शेतकऱ्याने मुख्यमंत्री, कृषिमंत्री, रोजगार हमी मंत्री, जिल्हा कृषी अधीक्षक, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करूनसुद्धा त्याला अद्याप अनुदानाचे बिल मिळाले नाही. दुसरे बिल काढण्यासाठी संबंधित कृषी सहाय्यक केकान हे पैशांची मागणी करतात. यामुळे बिल काढण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचे संबंधित शेतकऱ्याने सांगितले आहे.

योग्य ती कारवाई करणार
मी नुकताच करमाळ्याचा पदभार स्वीकारला आहे. याबाबतची चौकशी करून शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये जे अधिकारी दोषी आढळतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.
- एम. एस. पोले, तालुका कृषी अधिकारी, करमाळा

अन्यथा उपोषण करणार
कृषी सहाय्यक केकान यांना विचारणा केली असता, कृषी खात्यातील गायकवाड हे पैसे दिल्याशिवाय बिलावर सही करत नाहीत, असे सांगतात. तत्कालीन तालुका कृषी अधिकारी गायकवाड यांना बिल मागितले तर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. लवकर अनुदान मिळाले नाही तर करमाळा कृषी कार्यालयासमोर उपोषण करणार आहे.
- नितीन काळे, शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT