kol.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

अर्थव्यवस्थेचा कचरा करणाऱ्या सरकारला धडा शिकवा : डॉ. अमोल कोल्हे

सकाळ वृत्तसेवा

तळमावले (सातारा) : सातारा लोकसभेच अधिकृत उमेदवार श्रीनिवास पाटील व पाटण विधानसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार सत्यजित पाटणकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीची जाहीर सभा डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थित पार पडली. 

या सभेत श्रीनिवास पाटील, सत्यजित पाटणकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे, सभापती उज्वला जाधव, यशस्विनी पाटणकर, काँग्रेस नेते हिंदुराव पाटील, कराड तालुका काँग्रेस अध्यक्ष वंदना आचरे, प. स. सदस्य प्रतापरादेसाई, अविनाश जानुगडे, सुजित पाटील, संजय देसाई, रमेश मोरे समाजसेवक योगेश पाटणकर आदी मंडळी उपस्थित होते.

‌प्रास्तावित कामाच्या भूमीपूजनाचा फंडा काढून आमदार साहेब जनतेला फसवत असल्याचा आरोप सत्यजित पाटणकरांनी केला. निव्वल भूमिपूजन करून विकासकामे पूर्णत्वास न्यायची नाहीत आणि 15000 हजार कोटींची कामे केली असे जनतेला सांगायचे हा विकास कुठं आहे, हीच सर्वसामान्य जनतेत चर्चा असल्याचा टोला विद्यमान आमदारांना लगावला.

येत्या काळात बेरोजगारांना संधी प्राप्त करून देण्यासाठी आता पाटण तालुक्यात आमच्या माध्यमातून नवीन महाबळेश्वर स्थापन होत आहे, साखर कारखाना सुद्धा चालू होतं आहे. यातून युवकांना रोजगार मिळेल. त्यामुळे लोकांनी आता या युवकांची फसवणूक करणाऱ्या सरकारला धडा शिकवावा असेही सत्यजित पाटणकर म्हणाले.

 डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या भाषणात भाजप-सेना सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, पंतप्रधानांना दक्षिणेत गेल्यावर लुंगी नसायचं समजतंय पण आमच्या महाराष्ट्रात आल्यावर ते धोतर का नेसत नाहीत, असा टोला लगावला. भाजप-युती सरकार जनतेला गृहीत धरत आहे पण आता जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल. या सरकारने अर्थव्यवस्थेचा कचरा करून उद्योगधंदे बंद पाडलेत त्यामुळे आजचा युवक बेरोजगार झालाय, जाहिराती बघून तेल-साबण निवडायचे असते सरकार नाही. त्यामुळे अशा निष्क्रिय सरकारला आता घरी बसवायची वेळ आली आहे, असे डॉ. कोल्हे म्हणाले.

याप्रसंगी श्रीनिवास पाटील यांनी शरद पवार यांच्या खांद्याला खांदा लावून मी काम केले आहे. त्यामुळे आता संसदेत जाऊन आपल्या विकासाची कामे नक्कीच करेन यासाठी आता आपण सर्वांनी आपले मत महाघाडीला द्यावे असे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय देसाई यांनी केले, तर सूत्रसंचालन सचिन जाधव यांनी केले. या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाघाडीच्या जाहीर सभेला ढेबेवाडी, कुंभारगाव, तळमावले विभागातील लोकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : वारजे माळवाडीत नवीन बसथांब्याजवळ कचऱ्याचे ढीग, कचरा कुजून परिसरात दुर्गंधी; प्रवाशांसह स्थानिक रहिवासी त्रस्त

Hybrid SUVs : पेट्रोल अन् इलेक्ट्रिक दोन्हीही! महिंद्रा आणि मारुती आणत आहेत स्वस्तात मस्त ब्रँड कार, जबरदस्त फीचर्स जाणून घ्या

"मराठीतील कांतारा...!" दशावताराची गोष्ट सांगणाऱ्या मराठी सिनेमाचा ट्रेलर VIRAL; प्रेक्षक अवाक

Pune Kothrud Police case: तीन तरुणींसोबत धक्कादायक कृत्य,चौकीत रात्रभर आंदोलन तरी तक्रार नाही

Ambad News : महागाईमुळे गॅस सिलेंडर परवडत नाही, महिलांनी पुन्हा चूल पेटवली जळतानासाठी डोक्यावर सरपाणाचा भारा

SCROLL FOR NEXT