Gender Test
Gender Test Sakal
पश्चिम महाराष्ट्र

‘म्हैसाळ’ हत्याकांडातील दोषींवर कारवाई होणार

सकाळ वृत्तसेवा

सांगली - म्हैसाळमध्ये झालेल्या स्त्रीभ्रूणहत्याकांडाविषयी सर्व माहिती घेतली असून दोषींना शासन होण्यासाठी शासनाकडून ठोस पावले उचलली जातील, असा इशारा शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. प्रत्येक शासकीय कार्यालयात ‘विशाखा’ समित्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. महिला अत्याचार रोखण्यासाठी या समित्या प्रभावी कार्य करत असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

डॉ. कायंदे यांच्यासह आमदारांची समिती सांगली दौऱ्यावर आहे. यावेळी ‘महिला व बालकल्याण’च्या योजनांबाबत सविस्तर आढावा समितीने घेतला आहे. त्या म्हणाल्या, ‘‘महिला अत्याचार रोखण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयात ‘विशाखा’ समिती स्थापन करण्याचे निर्देश आहेत. त्याचा आढावा समितीने घेतला आहे. जिल्ह्यात याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत असल्याचे चित्र दिसते आहे. ’’

‘‘वन विभागातील उपवनसंरक्षकाने महिला अधिकाऱ्याचा विनयभंग केला. त्यानंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याचीही सविस्तर माहिती घेतली आहे. याचा तपास पोलिसांकडून केला जाईल. तसेच म्हैसाळ येथे झालेल्या स्त्रीभ्रूणहत्याकांड प्रकरणी दिरंगाई झाली आहे. याचीही पोलिसांकडून सविस्तर माहिती घेतली. त्यावर लवकरच कारवाई केली जाईल. जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली आहे, मात्र दाखल गुन्ह्याची तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाईचे निर्देश दिले आहेत,’’ असे त्यांनी सांगितले.

त्या म्हणाल्या, ‘‘महिला व बालकल्याण विभागाकडून देण्यात येणाऱ्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचताहेत. तसेच कोरोना काळात विधवा झालेल्या बहुतांश महिलांना अनुदानही मिळाले आहे. त्‍यांच्‍या कुटंुबातील मुलांनाही पेन्‍शन योजना सुरु करण्‍यात आली आहे. जिल्ह्यातील महिला आघाडी सक्षमपणे कार्यरत असून शिवसेनेचे प्रत्येक काम तळागाळापर्यंत पोहोचवले जात आहे.’’ यावेळी जिल्हाप्रमुख संजय विभूते, कुपवाड शहरप्रमुख अमोल पाटील यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitesh Sharma PBKS vs SRH : पंजाब किंग्जनं पुन्हा कर्णधार बदलला; जितेश शर्मा हंगामच्या शेवटच्या सामन्यात करणार नेतृत्व

Buldhana Latest News : मोठा अनर्थ टळला! चारधाम यात्रेसाठी निघालेले बुलडाण्याती ३० प्रवासी थोडक्यात बचावले

Priyanka Gandhi : ''माझ्या आजीला, वडिलांना तुम्ही देशद्रोही म्हणणार, मग...'' प्रियांका गांधींचा भाजपवर हल्ला

Uddhav Thackeray: ठाकरेंकडून INDIA आघाडीच्या पंतप्रधानांच्या शपथविधीचं मोदींना निमंत्रण; म्हणाले, खुर्चीवर आहे तोपर्यंत...

Virat Kohli : विराट कोहली बीसीसीआयवर झाला नाराज; हा नियम रद्द करण्याची केली मागणी

SCROLL FOR NEXT