पश्चिम महाराष्ट्र

भाजपविरूद्ध देशातील सर्व छोटे मोठे 23 पक्ष एकत्र

सकाळवृत्तसेवा

जयसिंगपूर - केंद्रात आणि राज्यात काँग्रेस पुरस्कृत महाआघाडीची सत्ता येणार हे सत्य आहे. भाजपविरूद्ध देशातील सर्व छोटे मोठे 23 पक्ष एकत्रित आले आहेत. राज्यात खासदार राजू शेट्टी, प्रकाश आंबेडकर यांच्यासह दहा पक्षांना एकत्रीत करुन निवडणूकीला सामोरे जात आहोत, अशी माहिती माजी मुख्यंमत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. येथे श्री चव्हाण पत्रकार परिषदेत बोलत होते.

बहुतांश जागा वाटप झाले आहे. उर्वरित जागांचाही चार दिवसात निर्णय होईल. राहुल गांधीच देशाचे पंतप्रधान होतील असा विश्‍वासही श्री चव्हाण यांनी व्यक्त केला.

उदगाव येथे ल. क. अकिवाटे औद्योगिक वसाहतीमधील कार्यक्रमानंतर त्यांनी आगामी निवडणूकांच्या पार्श्‍वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधला. श्री. चव्हाण म्हणाले, लोकसभा निवडणूकीत राफेल घोटाळा प्रचाराच्या केंद्रस्थानी असेल. मतांची विभागणी टाळण्यासाठी व भाजप सरकारची मतांची टक्केवारी पाहता त्यांना गतवेळी 34 टक्‍के मतदान झाले होते. म्हणजेच 66 टक्‍के मतदान भाजप विरूद्ध झाले होते. मात्र मतांची विभागणी झाल्यामुळेच भाजपचा विजय झाला होता. यावेळी असे होवू देणार नाही.

श्री. चव्हाण म्हणाले, राज्यातील जागा वाटपाचे काम सुरू आहे. काँग्रेस - राष्ट्रवादीमधील व्यापक प्रमाणात जागा वाटपाची घोषणा होणार आहे. तसेच एक दोन ठिकाणी आपापल्या ताकदीनुसार उमेदारांची चाचणी करुन जागा वाटप होईल. प्रकाश आंबेडकर यांना ऑफर दिली आहे. मात्र अद्याप त्यांनी ती स्विकारली नाही. खासदार शेट्टी यांच्याशीही चर्चा झाली असून हातकणंगलेची जागा स्वाभिमानीला देण्यात देण्यात येईल. दोन दिवसात आणखी दोन जागेचा निर्णय होणार आहे. उत्तर
प्रदेशमध्ये महाआघाडीमुळे भाजपला 73 होत्या आता 50 जागांचा फटका बसणार आहे. त्यामुळे राहूल गांधी यांनाच पंतप्रधान करायचे आहे. कोल्हापूरसह राज्यातील सर्वच आघाडीच्या उमेदारांचा प्रचार जोमानेच करणार आहोत. देशात महाआघाडीची सत्ता आणायची असेल तर सर्वांनीच प्रामाणीक काम करणे गरजेचे आहे, असेही श्री. चव्हाण म्हणाले.

आमदार सतेज पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे, दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीने गमावली नववी विकेट, 150 धावांचा टप्पा गाठणार?

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT