Exotic Currency in Ganesh Temple Donation Box Of Inchanal
Exotic Currency in Ganesh Temple Donation Box Of Inchanal 
पश्चिम महाराष्ट्र

इंचनाळच्या गणेश मंदिर दानपेटीत परकिय चलन

अवधूत पाटील

गडहिंग्लज : इंचनाळ (ता. गडहिंग्लज) येथील गणेश मंदिराच्या दानपेटीत परकिय चलन आढळले आहे. बेहरीन व अमेरिका या दोन देशांचे हे चलन आहे. देवस्थान स्थानिक सल्लागार समितीने ग्रामस्थांच्या उपस्थितीत दानपेटी उघडल्यानंतर ही बाब समोर आली. दानपेटीतील परदेशी चलनाची भाविकात चर्चा होत आहे. 

इंचनाळ येथील प्राचीन गणेश मंदिर पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. संकष्टी, अंगारकी संकष्टी, गणेश जयंतीला हजारो भाविक दर्शनासाठी येतात. अंगारकी संकष्टी व गणेश जयंतीला अधिक गर्दी असते. शासनाने गतवर्षी गणेश मंदिराचा क वर्ग पर्यटनस्थळात समावेश केला आहे. त्यातून 25 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला. या निधीतून मंदिर परिसराच्या सुशोभिकरणाची कामे पूर्ण झाली आहेत. आता गणेश मंदिराचा समावेश ब वर्ग पर्यटनस्थळात होण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. 

दरम्यान, मंदिरात भाविकांसाठी दानपेटी बसविली आहे. दरमहा ही दानपेटी उघडली जाते. देवस्थान स्थानिक सल्लागार समितीचे पदाधिकारी ग्रामस्थांच्या उपस्थितीत ही दानपेटी उघडतात. शुक्रवारी (ता.17) ही दानपेटी सर्वांच्या उपस्थितीत उघडण्यात आली. त्यावेळी दानपेटीत अन्य रक्कमेबरोबरच परकिय चलन आढळले. विशेष म्हणजे अमेरिका आणि बेहरिन या दोन देशांची दोन नाणी मिळाली आहेत. दानपेटीतील परदेशी नाणी पाहून समितीचे पदाधिकारीही आश्‍चर्यचकित झाले. दानपेटीत प्रथमच अशा प्रकारे परकिय चलन मिळाले आहे. त्यामुळे हा विषय भाविकांमध्ये चर्चेचा झाला आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Accident: कोल्हापुरातील रस्त्यावर घडला 'कॅरम बोर्ड'सारखा थरार! भरधाव कारनं दुचाकींना उडवलं, तिघांचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल

Market Cap: सेन्सेक्स ऐतिहासिक उच्चांकावर; बीएसई कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 14 लाख कोटींची भर

Wayanad Lok Sabha Election Results: काँग्रेससाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या वायनाडमध्ये राहुल गांधींना धक्का?

"BJP ने आपल्याच समर्थकांना हिंसक बनवले," माजी मुख्यमंत्र्याच्या धक्कादायक आरोपांमुळे देशभरात खळबळ

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याबद्दल नागपूरच्या निशांत अग्रवालला जन्मठेपेची शिक्षा

SCROLL FOR NEXT