Market Cap: सेन्सेक्स ऐतिहासिक उच्चांकावर; बीएसई कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 14 लाख कोटींची भर

BSE Listed Companies Market Cap: इक्विटी बेंचमार्क निर्देशांक BSE सेन्सेक्स आणि NSE निफ्टीने सोमवारी (3 जून) तीन वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी केली आहे. एक्झिट पोलने भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) विजयाचा अंदाज व्यक्त केला.
Share Market Latest Update
Share Market Latest UpdateSakal

BSE Listed Companies Market Cap: इक्विटी बेंचमार्क निर्देशांक BSE सेन्सेक्स आणि NSE निफ्टीने सोमवारी (3 जून) तीन वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी केली आहे. एक्झिट पोलने भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) विजयाचा अंदाज व्यक्त केला. यामुळे शेअर बाजारात 3% पेक्षा जास्त वाढीसह निर्देशांकांनी उच्चांक गाठला.

BSE सेन्सेक्स 2,507 अंकांनी वाढून 76,469 वर बंद झाला, तर NSE निफ्टी 733 अंकांनी उसळी घेत 23,264 वर बंद झाला. निफ्टी बँक 1,996 अंकांनी 50,980 वर गेल्याने बँकिंग क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आणि मिडकॅप निर्देशांक 1,648 अंकांनी वाढून 53,353 वर पोहोचला. शेअर बाजारातील वाढीमुळे बीएसईवर लिस्टेड कंपन्यांच्या बाजार भांडवलात 14 लाख कोटींची वाढ झाली, ज्याने 425 लाख कोटी हा नवीन विक्रम प्रस्थापित केला.

Share Market Latest Update
सरकार स्थापन होताच PM मोदी ॲक्शन मोडमध्ये येणार! IDBI बँकेसह 'या' कंपनीतील हिस्सेदारी विकणार

सेन्सेक्सच्या पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, एनटीपीसी, स्टेट बँक ऑफ इंडिया, लार्सन अँड टुब्रो, अल्ट्राटेक सिमेंट आणि रिलायन्स इंडस्ट्रीज हे प्रमुख शेअर्स वधारले. एचसीएल टेक्नॉलॉजीज, एशियन पेंट्स, सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज, नेस्ले इंडिया आणि इन्फोसिस सर्वात जास्त घसरले आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (पीएसयू) आणि अदानी समूह दिवसभरातील सर्वोच्च कामगिरी करणारे शेअर्स ठरले. टॉप पाच निफ्टी गेनर्सपैकी चार पीएसयू शेअर्स होते, ज्यात पॉवर ग्रिड, एनटीपीसी, एसबीआय आणि ओएनजीसीचे शेअर्स होते. बजाज ऑटो सर्वाधिक तेजीत होता.

Share Market Latest Update
Adani Group: एक्झिट पोलमध्ये भाजपच्या विजयाची खात्री; अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये तुफान वाढ

PSU बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा (BoB) आणि कॅनरा बँक विक्रमी उच्चांकावर होते. वस्तू आणि सेवा कर (GST) च्या कक्षेत आणण्याच्या अपेक्षेने तेल आणि गॅस क्षेत्रातील शेअर्स तेजीत होते. पॉवर फायनान्सर्स पीएफसी आणि आरईसी तेजीत होते आणि प्रत्येकी 12% ने वाढ झाली, तर CONCOR 10% वाढीसह बंद झाला. एकूणच सकारात्मक कल असूनही, इप्का लॅबोरेटरीज शुक्रवारपासून 2% घसरल आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com