पश्चिम महाराष्ट्र

बोरगावातील टेक्स्टाईल कारखान्यास आग; 35 लाखांचे नुकसान

राजेंद्र हजारे

निपाणी : बोरगाव येथील टेक्स्टाईल पार्क वसाहतीतील रमेश टेक्स्टाईल पॉवरलूम कारखान्यास शॉर्टसर्किटमुळे (short circuit) भीषण आग लागली. रविवारी (१६) लागलेल्या या आगीत कारखान्याचे सुमारे ३५ लाखांचे नुकसान (damage) झाले असल्याचे कारखान्याचे मालक अमित जाधव यांनी सांगितले. मंगळवारी (१८) ही घटना उघडकीस आली.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, बोरगाव (boargaon) हेस्कॉमच्या वीज पुरवठ्यामुळे रविवारी संपूर्ण दिवस बंद असलेल्या कारखान्यात सायंकाळी अचानक विद्युत पुरवठा अधिक दाबाच्या प्रवाहामुळे कारखान्यात शॉर्टसर्किट झाला. त्यामुळे संपूर्ण कारखान्याला आग लागली. शेजाऱ्यांनी घटनेची कल्पना कारखाना मालकांना दिली. तातडीने अग्निशामक दलाच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तोपर्यंत आगीत कारखान्यातील मशीन, रॅपिड यंत्रमाग, सुताच्या गाठी, नवीन तयार होत असलेले कापड यासारख्या इतर वस्तू, इमारतीचा काही भाग आगीत भस्मसात झाला होता. या आगीमध्ये जवळपास ३५ लाखांचे नुकसान झाल्याची फिर्याद कारखाना मालकांनी सदलगा पोलिस (sadlaga police) ठाण्यात नोंदविली आहे.

कोरोना (covid-19) महामारीने जगाला वेठीस धरले आहे. त्यात पहिल्यांदाच यंत्रमाग, कापड व्यवसाय मोठ्या प्रमाणात भरडला गेला. कारखान्याला आग लागून लाखोंचे साहित्य जळून खाक झाले आहे. त्यामुळे पुन्हा कारखानदारीवर मोठे संकट निर्माण झाले आहे. लाखो रुपयांची व्याजरुपी रक्कम गोळा करून उभा केलेल्या कारखान्याची नासधूस झाली आहे. त्यामुळे कारखाना मालक अडचणीत सापडला आहे. पुन्हा कारखाना उभारणीसाठी शासनाने मदत करणे गरजेचे असल्याची मागणी कारखाना मालकांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT