esakal | मराठा आरक्षण प्रश्नी भूमिकेबाबत काय म्हणाले संभाजाराजे ?
sakal

बोलून बातमी शोधा

मराठा आरक्षण प्रश्नी भूमिकेबाबत काय म्हणाले संभाजाराजे ?

मराठा आरक्षण प्रश्नी भूमिकेबाबत काय म्हणाले संभाजाराजे ?

sakal_logo
By
संदीप खांडेकर

कोल्हापूर : मराठा आरक्षणप्रश्नी (maratha reservation) भूमिका लवकरच जाहीर करेन, असे खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती (sambhajiraje chhatrapati) यांनी ट्विट केल्याने ते नेमके कोणती भूमिका घेणार, याची मराठा समाजात उत्सुकता लागून राहिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने (suprime court) मराठा आरक्षण रद्द केल्याने मराठा समाजात अस्वस्थता आहे. बेरोजगार तरुण हवालदिल झाले असून, नोकरीची चिंता त्यांना लागून राहिली आहे. स्पर्धा परीक्षेद्वारे ज्यांनी यश मिळवले, त्यांना अद्याप नियुक्तीपत्रे मिळालेली नाहीत. त्याचबरोबर अनेक मराठा विद्यार्थ्यांना कुणबी दाखले मिळण्यात अडचणी येत असल्याने त्यांच्यासमोर अडचणीचा डोंगर आहे. सकल मराठा समाजातील (maratha community) राज्यभरातील समन्वयक ऑनलाईन बैठका घेऊन मराठा आरक्षणप्रश्नी काय करायचे, या संदर्भात चर्चा करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजातील तरुणाईने संयमाने भूमिका घ्यावी, असेही काहींचे म्हणणे आहे. त्याचबरोबर मराठा समाजाला, ओबीसींना (OBC) ज्या सवलती मिळतात, त्या देण्यात याव्यात असाही सूर आहे.

हेही वाचा: कोल्हापुरात खत दरवाढीविरोधात राष्ट्रवादीची निदर्शने

या परिस्थितीत संभाजीराजे नेमकी कोणती भूमिका घेणार याविषयी विचारणा होत आहे. शिव-शाहू यात्रेच्या निमित्ताने त्यांनी महाराष्ट्र पिंजला असून, बहुजन समाजाच्या अडचणी जाणून घेतल्या आहेत. त्यासह मराठा समाजाला भेडसावणाऱ्या समस्याही त्यांनी समजावून घेतल्या आहेत. परिणामी मराठा समाजाला न्याय देणारा आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यांनी आज मराठा आरक्षण प्रश्नी भूमिका जाहीर करणार असल्याचे ट्विट करताच समाजात ते नेमकी कोणती भूमिका घेणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे.