Firing
Firing 
पश्चिम महाराष्ट्र

माजी गृहराज्यमंत्र्यांच्या मतदारसंघात गोळीबार 

तात्या लांडगे

सोलापूर : राज्याचे माजी गृह राज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्या अक्‍कलकोट विधानसभा मतदारसंघातील शेगाव येथे शनिवारी सकाळी 7.30 च्या सुमारास सख्ख्या चुलत भावांमध्ये गोळीबाराची घटना घडली. पोलिस पाटील होण्यावरुन व शेतीच्या वादातून हा गोळीबार झाल्याची नोंद पोलिसांत झाली आहे. दरम्यान, 2004 मध्ये विधानसभा निवडणुकीत याच गावात गोळीबार झाला होता. 

घटनेची हकीकत अशी की, पोलिस पाटील होण्यात महादेव पाटील यांनी अडथळा आणल्याचा राग पिंटू पाटील यांच्या मनात होता. तसेच शेतीचा वादही त्यांच्यात मागील काही महिन्यांपासून सुरु आहे. दरम्यान, मागील तीन-चार दिवसांपूर्वी त्यांच्यात शिवीगाळ झाली होती. त्यावेळी दोघांनी एकमेकांना बघून घेण्याची भाषा केल्याचेही समजते. शनिवारी सकाळी हा वाद विकोपाला गेला आणि पिंटू उर्फ अण्णाराव याने स्वत:च्या बंदुकीतून महादेव पाटील यांच्यावर गोळी झाडली. सुदैवाने ती गोळी महादेव पाटील यांच्या कमरेला घासून गेली. त्यानंतर त्यांना तातडीने सोलापुरातील शासकीय सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु असून ते आता शुध्दीवर असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. दरम्यान, अवैध वाळू उपसाप्रकरणी पिंटू पाटील याच्यावर लोकसभा निवडणुकीपूर्वी पोलिसांनी एमपीडीएची कारवाई केली होती. या गोळीबारामागे अवैध वाळू उपसा हेच कारण असल्याची चर्चा अक्‍कलकोटमध्ये सुरु आहे. 

गोळीबार करुनही दुसऱ्या भावाला मारहाण 
मल्लिाकार्जुन अण्णाराव पाटील (वय - 34) हे महादेव पाटील यांचे धाकटे बंधू आहेत. ते महादेव व पिंटू उर्फ अण्णाराव पाटील यांच्यातील भांडण सोडवायला गेले. त्यावेळी त्यांच्या भावकीतील श्रीशैल बसप्पा पाटील, उमेश पाटील, रमेश पाटील यांनी आपल्याला दगडाने मारहाण केल्याची फिर्याद मल्लिकार्जुन पाटील यांनी सिव्हिल पोलिसांत दिली. त्यामध्ये त्यांच्या उजव्या पायाला मार लागला असून त्यांच्यावरही सोलापुरातील शासकीय सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

पूर्वीच्या गोळीबारात जामिनावरील आरोपींचा राडा 
2004 च्या लोकसभा निवडणुकीत शेगाव येथील गोळीबार प्रकरण राज्यभर गाजले होते. या गोळीबार प्रकरणातील संशयीत आरोपी महादेव पाटील, पिंटू उर्फ अण्णाराव पाटील हे सध्या जामिनावर आहेत. मात्र, मागील काही महिन्यांपासून या सख्ख्या भावांमध्येच शेती अन्‌ वैयक्‍तिक कारणांवरुन भांडण सुरु आहे. तो वाद विकोपाला गेला अन्‌ पुन्हा गोळीबाराची घटना घडली. माजी गृह राज्यमंत्र्यांच्या तालुक्‍यात पहिल्या गोळीबार प्रकरणाचा निकाल लागला नाही, तोवर आता दुसऱ्यांदा गोळीबार झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : अमेरिका, कॅनडा अन् अरब देशांकडून 'आप'ला फंडिंग; ED कडून गृहमंत्रालयाला अहवाल

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंबईतील विले पार्ले येथील शाळेत बरोबर ६ वाजता मतदान बंद

Gadchiroli News : कधी वाघ, कधी हत्ती...सोसायचे किती? ग्रामस्थ भयछायेत; जंगलात तेंदूपाने संकलन करताना जीव मुठीत!

Ebrahim Raisi: इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

SCROLL FOR NEXT