sakal
sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : दहावी परिक्षेसाठी मोफत बससेवा

मिलिंद देसाई

बेळगाव : दहावीची परीक्षा २८ मार्च ते ११ एप्रिल या काळात होणार आहे. या काळात विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर ये-जा करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी पेपरच्या दिवशी मोफत बस प्रवासाची सोय उपलब्ध करून देण्याचा निर्णय परिवहन मंडळाने घेतला आहे. दहावीची परीक्षा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने परीक्षेची तयारी सुरु केली असून परीक्षा केंद्रांवर सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यास सुरुवात झाली आहे

त्याचप्रमाणे दहावीची परीक्षा देणारे अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातून ये-जा करीत असतात. त्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याकरिता कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाने विद्यार्थ्यांना मोफत प्रवासाची व्यवस्था केली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेशपत्र दाखवून परीक्षा केंद्रापर्यंत बसमधून विनातिकीट ये-जा करता येणार आहे. परिवहन महामंडळाने या बाबतचा आदेश जाहीर केला आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर जाण्यासाठी त्रास होऊ नये, याकरिता दरवर्षी परिवहन मंडळाकडून मोफत बस प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना सामान्य आणि एक्स्प्रेस बसमधून प्रवास करता येतो.

दहावी परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राजवळ बस थांबविण्याची विनंती केल्यास त्यांना सहकार्य करावे, काही ठिकाणी परीक्षा केंद्रे बस स्थानकापासून दूर असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विनंती केल्यानंतर त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी बस थांबवावी, अशा प्रकारच्या सूचना परिवहन खात्याच्या कर्मचाऱ्यांना करण्यात आल्या आहेत.

दहावी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलची माहिती एसएमएसद्वारे देण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रांवर एकाच वेळी गर्दी होऊ नये, याकरिता शिक्षण खात्याने हा निर्णय घेतला आहे. तसेच विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून व्हॉट्सअपद्वारेही परीक्षा हॉलची माहिती दिली जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Latest Marathi News Live Update : नसीम खान असणार काँग्रेसचे स्टार प्रचारक

SCROLL FOR NEXT