theft1
theft1 
पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर : पूरग्रस्तांच्या घरांवर चोरट्यांचा डल्ला 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर ः पूरग्रस्तांच्या बंद घरे फोडून चोरट्यांनी हात साफ केल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. त्यातील दोन मोठ्या घरफोड्या आज उघड झाल्या. चोरट्यांनी कसबा बावडा माळी मळा येथील घरातून 82 तोळे वजनाचे तर लक्ष्मीपुरीतील घर फोडून त्यातील 14 तोळे असे सुमारे एक किलो सोन्याचे दागिन्यासह चांदीचा ऐवज व 50 हजाराची रोकड असा लाखोंचा ऐवज लंपास केला. याबाबतची शाहूपुरी व लक्ष्मीपुरीत नोंद झाली. उत्तरेश्‍वर पेठेतील घरांवर चोरट्यांनी असाच डल्ला मारल्याचा प्रकार पुढे आला आहे. मात्र पुराच्या पाण्यामुळे याची अद्याप नोंद झालेली नाही. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, महापूराच्या विळख्यात रमणमळा, मुक्त सैनिक वसाहत, घोडकेवाडी, जाधववाडी, बापट कॅंम्प, नागाळा पार्क, लक्ष्मीपुरी आदी शहरातील भागही अडकला आहे. पूराचे पाणी थेट घरात शिरल्याने नागरिकांना घराला कुलूप लावून स्थलांतरित व्हावे लागले. अशा परिस्थितीत मदतकार्याचा बहाणा करत तराफाचा आधार घेत चोरट्यांनी पुरात अडकलेले बंद फ्लॅट, घरे, बंगले फोडून हात साफ केले. याबाबत अनेक तक्रारी पोलिस ठाण्यात दाखल झाल्या. मात्र पुराच्या पाण्यामुळे नागरिकांना व पोलिसांना घटनास्थळी पोहचण्यात अडथळे येत असल्याने अद्याप अनेक चोऱ्या उघड झालेल्या नाहीत.

दरम्यान, काल रात्री कसबा बावडा येथील माळी मळा येथे सुर्यकांत विठ्ठल माळी हे आणि शेजारी त्यांचे चुलत भाऊ मिलींद माळी कुटुंबासोबत राहतात. महापुराचे पाणी त्यांच्या घरात 5 ऑगस्टला शिरले. तसे ते भावासह स्थलांतरीत झाले. दरम्यान पुराच्या चार ते पाच फूट पाण्यातून माळी बंधुंच्या घराचा कडीकोयंडा उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील लाकडी व लोखंडी कपाटे उटकटली. त्यातील सुर्यंकात माळी यांच्या घरातील पाच तोळ्याचे सोन्याचे बिलवर, चार तोळ्याच्या पाटल्या, अडीच तोळ्याचा साज, तीन तोळ्याची चेन, एक तोळ्याची अंगठी, पाच तोळ्याच्या पाटल्या, तीन तोळ्याच्या अंगठ्या, एक तोळ्याचा लफा, तीन तोळ्याचा राणी हार, दीड तोळ्याच्या दोन अंगठया, पाच तोळ्याच्या पाटल्या, पाच तोळ्याचे बिलवर, दीड तोळ्याचा नेकलेस, दोन तोळ्याचा लक्ष्मीहार, तीन तोळ्याचे गंठन, दोन तोळ्याच्या दोन चेन, सहा ग्रॅमच्या रिंगा, तीस हजाराची रोकड तर मिलींद माळी यांच्या घरातील दीड तोळ्याचे सोन्याचे टॉप्स्‌, अर्धातोळ्याची अंगठी, दहा तोळ्याच्या पाटल्या, चार तोळ्याचे बिलवर, सहा तोळ्याचा नेकलेस, तीन तोळ्याचे गंठन, दोन तोळ्याच्या अंगठ्या, तीन तोळ्याची चेन, दीड तोळ्याचा लक्ष्मी हार, अर्धा तोळ्याची नथ, चार ग्रॅमच्या रिगा, दोन तोळ्याच्या चार अंगठ्या आणि 20 हजाराची रोकड असा 82 तोळ्याहून अधिकचे सोन्याचे दागिने आणि 50 हजाराची रोकड लंपास केली. काल दुपारी हा प्रकार उघडकीस आला. याबाबतची फिर्याद सुर्यकांत माळी यांनी शाहूपुरी पोलिसात दिली. 

दरम्यान, अमोल मनोहर कांबळे हे लक्ष्मीपुरी मॉल शेजारी कुटुंबासोबत राहतात. ते औषध दुकानात काम करतात. त्यांची आई ही सावित्रीबाई हॉस्पिटलमध्ये नोकरीस आहेत. मंगळवारी अचानक पुराचे पाणी त्यांच्या घरात शिरले. तसे त्यांनी घरातील साहित्य व किमंती ऐवज पहिल्या मजल्यावरील तिजोरीत ठेवला. त्यानंतर ते घराला कुलूप लावून जवळच्या श्रमिक हॉलमध्ये स्थलांतरित झाले. पुराच्या पाण्यातून चोरट्याने त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. पहिल्या मजल्यावरील तिजोरी फोडून त्यातील तीन नेकलेस, ब्रेसलेट, चेन, दोन गंठन, दोन अंगठ्या, झुबे, वेल, फुले असे 14 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीच्या मूर्ती, दागिने लंपास केले. त्याचबरोबर कपाटात कांबळे यांची आई व भाचा यांच्या पगाराचे 18 हजाराची रोकडही लंपास केली. आज पुराचे पाणी काहीप्रमाणात ओसरल्यानंतर कांबळे यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी घरात जाऊन पाहिल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यांनी याची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांना दिली. उत्तरेश्‍वर पेठ येथे पुरात अडकलेली दोन घरेही फोडण्यात आल्याच्या तक्रारी पोलिस ठाण्यात आल्या आहेत. त्याची शहानिशा करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

Team India squad T20 WC24 : आज हार्दिक पांड्याचा लागणार निकाल; टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा, 'ही' 9 नावे निश्चित

Bank Loan: ग्राहकांना बँकाकडून कर्ज मिळणे होणार अवघड; रेटिंग एजन्सीचा दावा, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT