पश्चिम महाराष्ट्र

खड्डेमुक्त महाराष्ट्र मोहीम जोरात

निखिल पंडितराव

कोल्हापूर - खड्डेमुक्त महाराष्ट्र मोहिमेसाठी फेसबुकवरून सुरू झालेल्या राजकारणाला सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट कामातूनच विरोधकांना उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. खासदार सुप्रिया सुळे या खड्ड्यांचे फोटो फेसबुकवर अपलोड करत आहेत; तर मंत्री श्री. पाटील यांनी खड्डेमुक्त झाल्याचे फोटो अपलोड करण्यास सुरुवात केली. यात आधीचा (बिफोर) खड्डा पडलेला फोटो आणि नंतर (आफ्टर) खड्डा बुजवलेला फोटो अगदी सॅटेलाईटच्या लोकेशनसह अपलोड करण्यात येत आहेत. 

पावसाळ्यामुळे राज्यातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले. हे खड्डे मुजवले गेले नसल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत होता. यावरून राजकारण सुरू झाले. त्यातच १५ डिसेंबरपर्यंत सार्वजनिक बांधकाम खात्याकडील राज्यातील सर्व रस्ते खड्डेमुक्त होतील. यासाठी स्वतंत्र वॉर रूम उघडली असून खड्डेमुक्त रस्ते करण्यासाठी लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी मोबाईल ॲपही तयार केल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री पाटील यांनी जाहीर केले. लगेच राष्ट्रवादीकडून मंत्री पाटील यांना घेरण्याचा प्रयत्न सुरू झाला.

खासदार सुप्रिया सुळे यांनी खड्डा वुईथ सेल्फी ही मोहीम सुरू केले. रस्त्यावर खड्ड्यांसोबत फोटो काढून फेसबुकवर टाका आणि मंत्री श्री. पाटील यांना दाखवा, असे आवाहन केले. त्यांच्या फेसबुक आवाहनाला त्यांच्यासह माजी मंत्री सुनील तटकरे, अगदी खासदार धनंजय महाडिक यांच्यासोबत लोकांनीही फोटो टाकण्यास सुरुवात केली. फेसबुकवरून सुरू झालेल्या या खड्डेमुक्तीच्या राजकारणाला मंत्री श्री. पाटील यांनी ही खड्डे मुजवण्याचे काम जोरात सुरू करून खड्डे भरण्यात येत असलेल्या कामाचे, झालेल्या कामाचे फोटो टाकून उत्तर देण्यास सुरुवात केली. 

सोशल मीडियावरून सुरू झालेल्या या राजकीय खेळीस फेसबुकवरच जशास तसे उत्तर देण्याचे काम सुरू झाले. दररोज चंद्रपूरपासून कोकणापर्यंत कोणत्या रस्त्यांवरील खड्डे भरले याचे फोटो अपलोड होत आहेत; तर राज्यात आणखी कुठे खड्डे आहेत हे खासदार सुळे त्यांना दाखवत आहेत. एकूणच राज्यातील खड्डेमुक्त महाराष्ट्र मोहीम जोरास सुरू झाली. 

‘‘खड्डेमुक्त महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत आढावा घेण्यासाठी मी स्वतः दोन जिल्ह्यांत दररोज फिरतो. दहाहून अधिक जिल्ह्यांचा दौरा आत्तापर्यंत केला. काही दिवसांत अन्य जिल्हेही पूर्ण होतील. प्रत्येक जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना स्वतःचा कामाचा आढावा घेण्याच्या सूचना केल्या आहेत. हे काम सुरू असून दर्जाबाबातही सक्त सूचना दिल्या.’’
- चंद्रकांत पाटील, 
सार्वजनिक बांधकाम मंत्री

दृष्टिक्षेपात...
#  सार्वजनिक बांधकामकडे राज्यातील ९६ हजार किलोमीटर
#  ग्रामीण रस्ते २ लाख ५६ हजार कि.मी., देखभाल जि.प.तर्फे 
# रस्त्यांच्या कामासाठी वर्षाला सुमारे ४ हजार कोटींचे बजेट
#  खड्डे भरण्यासाठी २ हजार कोटी रुपये 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT