कोल्हापूर ः जागतिक वारसा सप्ताहानिमित्त रविवारी कोल्हापूर वस्तूसंग्रहालय (टाऊन हॉल) येथे विविध उपक्रमांना प्रारंभ झाला. या वेळी परिसरातील स्वच्छता करताना विविध कलासंस्थांचे पदाधिकारी.
कोल्हापूर ः जागतिक वारसा सप्ताहानिमित्त रविवारी कोल्हापूर वस्तूसंग्रहालय (टाऊन हॉल) येथे विविध उपक्रमांना प्रारंभ झाला. या वेळी परिसरातील स्वच्छता करताना विविध कलासंस्थांचे पदाधिकारी. 
पश्चिम महाराष्ट्र

चला, मातीचा वारसा जपूया...!

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - जागतिक वारसा सप्ताहानिमित्त टाऊन हॉल कोल्हापूर वस्तुसंग्रहालयाच्या पुढाकाराने आजपासून विविध कृतिशील उपक्रमांना प्रारंभ झाला. सात दिवस विविध कलासंस्था, कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहभागातून स्वच्छता, अमूल्य ठेव्याच्या जतनाविषयी जनजागृती आणि त्या त्या वारशांच्या कलाकृती साकारल्या जाणार आहेत. 

ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत उपक्रमाला प्रारंभ झाला. टाऊन हॉल परिसराची स्वच्छता, संग्रहालयातील विविध दुर्मिळ वस्तू व शिल्पकृतींची स्वच्छता झाली. टाऊन हॉल परिसराच्या कलाकृतीही कॅनव्हासवर साकारल्या. संग्रहालयाचे अभिरक्षक अमृत पाटील, कोल्हापूर आर्ट फाउंडेशनचे समन्वयक प्रशांत जाधव यांनी उद्देश सांगितला. रंगबहार संस्थेचे अध्यक्ष अजय दळवी, कलासाधना मंचचे विजय टिपुगडे, मोहम्मदअली मुजावर, शिवाजी मस्के, रियाज शेख, संजय शेलार, मनोज दरेकर, नागेश हंकारे, सुनील पंडित, अर्चना देसाई आदी उपस्थित होते.
 
बावीसशे वर्षांपूर्वीचं कोल्हापूर अनुभवायचं असेल तर टाऊन हॉल येथील वस्तुसंग्रहालय पाहायलाच हवे, ही सकारात्मक मानसिकता विविध उपक्रमांतून पुढे आली आणि काही वर्षांपूर्वी ओस पडलेल्या या संग्रहालयाकडे साऱ्यांचीच पावलं वळू लागली. डेक्कन ओडिसी असो किंवा शालेय विद्यार्थ्यांच्या क्षेत्र भेटी. अशा माध्यमातूनही हा अमूल्य ठेवा सर्वांपर्यंत पोचू लागला आहे. बावीसशे वर्षांपूर्वी कोल्हापुरात मातीची भांडी कशी होती, आरशांना पंचधातूच्या फ्रेमची सजावट कशी होती, अशा कोल्हापूरच्या प्राचीन वैभवापासून ते ब्रह्मपुरी उत्खननात सापडलेले विविध प्राचीन अवशेष येथे आत्मीयतेने जपून ठेवले आहेत. पंचधातूच्या सुमारे ३५ वस्तू अशा आहेत, की कोल्हापूर त्या काळातही किती विकसित होते, याचे ते पुरावे आहेत. 

असा होईल उपक्रम :
 सोमवार (ता. २०) - टाऊन हॉल परिसरात कलामंदिरचे विद्यार्थी तैलरंग व जलरंगातील कलाकृती साकारतील. 
 २१ ते २३ नोव्हेंबर - टाऊन हॉल परिसरात दळवीज्‌ आर्टस्‌ इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी स्वच्छता व कलाकृती साकारतील.
 २४ नोव्हेंबर - टाऊन हॉल परिसरात ‘कलानिकेतन’ तर चंद्रकांत मांडरे कलादालनात ‘कलामंदिर’चे विद्यार्थी सहभागी होतील.
 २५ नोव्हेंबर - संजय शेलार यांची जलरंगातील चित्र प्रात्यक्षिके.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Latest Marathi News Live Update: 'नागपूर एअरपोर्ट बॉम्बने उडवू'; धमकीचा मेल आल्याने खळबळ

Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

SCROLL FOR NEXT