Belgaum Educational District's ssc results are reduce
Belgaum Educational District's ssc results are reduce 
कोल्हापूर

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याची दहावीच्या निकालात का होते घसरण ? यंदा तरी निकालाचा टक्‍का वाढणार का ?

मिलिंद देसाई

बेळगाव - शैक्षणिक हब म्हणून ओळख असलेल्या बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याची दहावीच्या निकालात मोठी घसरण होत आहे. त्यामुळे हा जिल्हा राज्यात निकालात मागे राहत आहे. त्यामुळे दरवर्षी निकालात वाढ होण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. परंतु, त्याला अद्यापही यश मिळालेले नाही. अशातच यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या दहावी परीक्षेचा निकाल बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यासाठी समाधानकारक असणार की चिंता वाढविणारा, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे.

तीनवेळा टॉप टेनमध्ये

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याचा निकाल दरवर्षी कमी लागत असून 2010 पासून केवळ तीन वेळाच शैक्षणिक जिल्हा राज्यात पहिल्या दहा क्रमांकात होता. 2014 मध्ये तत्कालीन जिल्हा शिक्षणाधिकारी रत्नाकर शेट्टी यांच्या प्रयत्नामुळे शैक्षणिक जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आला होता. त्यानंतर मात्र सातत्याने निकालात घसरण होत असून विद्यार्थ्यांसाठी अधिक वर्ग, शिक्षकांना विशेष प्रशिक्षण आदी उपाय योजना करुन निकालवाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत.

गतवर्षी कमालीची घसरण

चिक्‍कोडी शैक्षणिक जिल्हा दरवर्षी राज्यात पहिल्या पाच क्रमांकात येत असताना बेळगाव शैक्षणिक जिल्हा मात्र निकालात नेहमीच मागे राहत आहे. 2019 मध्ये बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याची राज्यात 24 क्रमांकावर घसरण झाली होती. त्यानंतर निकालवाढीसाठी शिक्षण खात्याने 2019-20 च्या शैक्षणिक वर्षात सातत्याने उपक्रम राबविले. त्यामुळे यंदा निकालात वाढ होईल, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांतून व्यक्‍त होत असतानाच यंदा कोरोनाचे संकट उभे ठाकले. यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली. परिणामी, यंदा निकालात वाढ होणार की नाही, याची चिंता जिल्हा शिक्षण खात्याला आहे.

बेळगाव शहर, खानापूर मागेच

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील बेळगाव तालुका, कित्तूर, रामदुर्ग, सौंदत्ती, बैलहोंगल तालुक्‍याचा निकाल दरवर्षी चांगला लागतो. मात्र बेळगाव शहर आणि खानापूर तालुका निकालात मागे राहत आहे. या दोन्ही विभागांचा गेल्या दहा वर्षात सरासरी निकाल 70 ते 75 टक्‍के इतकाच लागला आहे. त्यामुळे बेळगाव शहर आणि खानापूरचा निकाल अधिक प्रमाणात लागल्याशिवाय बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याच्या निकालात वाढ होणार नाही.

  • निकालात विना अनुदानित शाळा आघाडीवर
  • सरकारी माध्यमिक शाळांचा निकाल उत्तम
  • शहरी भागातील विद्यार्थी अधिक संख्येने उत्तीर्ण
  • बेळगाव तालुका, रामदुर्ग तालुक्‍याचा निकाल चांगला
  • परीक्षा लांबल्याने यंदा निकालावर परिणाम शक्‍य

यंदा कोरोनाचे संकट असतानाही बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात परीक्षा अतिशय चांगल्याप्रकारे झाली आहे. तसेच विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे दडपण न घेता परीक्षा देण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे यावेळी निकालात नक्‍कीच वाढ होईल, असा विश्‍वास आहे.
- ए. बी. पुंडलिक, जिल्हा शिक्षणाधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीच्या अडचणी वाढल्या, स्टब्सपाठोपाठ अक्षर पटेलही बाद

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT