Camel, horse journey from Tarkarli to Madhya Pradesh ....
Camel, horse journey from Tarkarli to Madhya Pradesh .... 
कोल्हापूर

तारकर्लीपासून ऊंट, घोड्यांचा पायी प्रवास.... 

सकाळवृत्तसेवा

राशिवडे बुद्रुक  : लॉकडाउन सुरू झाल्यापासून एकदाच रेशन मिळाले. घोड्यांना, उंटांना चारा नाही, पोटापाण्याचे आबाळ झाले. म्हणून आम्ही आमचे कुटुंब समुद्रकिनाऱ्यावर ठेवून बाहेर पडलो. ऊंट, घोड्यांना चारापाणी देत घाट माथा चढून आलो आणि खऱ्या माणुसकीचे दर्शन आम्हाला झाले. राधानगरी तालुक्‍यात आजपहाटे प्रवेश केल्यापासून जागोजागी मदतीच्या रूपाने देव दर्शन होऊ लागले.

कुणाकडून चहा तर कोणाकडून नाष्टा, जेवण ही जाणीव आम्हाला घाटमाथ्यावर झाली. आता या प्रेमळ शिदोरीच्या आधारावर पुढे 900 किलोमीटरचा प्रवास करणार आहोत. ही भावना आहे मध्य प्रदेशकडे निघालेल्या तरूणांची. 

मालवण (तारकर्ली) येथे आपले कुटुंब सोडून सहा जण चार दिवसापूर्वी बाहेर पडले. पाच उंट व दहा घोडे हा तांडा घेऊन ते मध्यप्रदेशपर्यंत 900 किलोमीटरचा पल्ला गाठण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडले खरे पण डोक्‍यावर ऊन नि पायाला चटके या परिस्थितीत पुढे काय मांडून ठेवले आहे हे त्यानाही सांगता येत नाही. चार दिवसात तारकर्ली सोडल्यापासून पोटाला अन्न मिळालेच नाही. सोबतच्या शिदोरीवर कसेबसे तीन दिवस काढले. मिळेल तिथे ओढ्या नाल्यांना पाण्याने पोट भरले. आज त्यांनी घाटमाथा सर केला. पहाटे-पहाटे राधानगरी परिसरात आल्यानंतर राधानगरीकरांनी चहा दिला. तारळ्यामध्ये नाश्‍ता मिळाला. शिरगाव येथेही चहा नाश्‍ता झाला. येळवडे येथे शिरा-भाताचे जेवण मिळाले. खऱ्या माणुसकीचे दर्शन घाटावर आल्यानंतर आम्हाला घडले. हे त्यांनी मनभरून सांगितले. 

तांड्यात गोपाल चव्हाण, परमेश्वर जगताप आणि आनंद शिंदे हीच जाणती तिघे बाकी चार अल्पवयीन मुलेच. हा ताफा चालत चालत मध्यप्रदेश कडे बडवाणी जिल्ह्यातील सैंदवा गावाकडे निघाला आहे. प्रत्येक तालुक्‍यावर त्यांची अडवणूक होते, थर्मल ने तपासणी केली जाते. कुठे जवळही उभा करून घेतले जात नाही. माणसाकडून दहा फूट अंतर ठेवून मिळणारी वागणूक त्यांच्या मनाला वेदना देत आहे. असे असले तरी कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यापासून मायेमुळे त्यांचा उत्साह वाढला आहे. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

IPL 2024 DC vs RR Live Score: दुसऱ्याच चेंडूवर राजस्थानला मोठा धक्का! जैस्वालला ४ धावांवरच झाला आऊट

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Bidkin Crime News : धक्कादायक! भीशीचे व व्याजाचे पैसे न दिल्याने महिलेसह पाच मुलांचे अपहरण

SCROLL FOR NEXT