Panhala Police Witchcraft esakal
कोल्हापूर

धक्कादायक! पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय तरी काय? चोरीच्या संशयातून पत्नीची भोंदूबुवासमोर विवस्त्र पूजा

भोंदूबुवा पीडितेकडे शरीर संबंधाची मागणी करीत होता. त्याला तिने दाद दिली नाही.

सकाळ डिजिटल टीम

एक दिवस पतीने पीडितेला चोरीचा जाब विचारला व या संशयाची शहानिशा करण्यासाठी भोंदूबुवाच्या मदतीने पूजा करण्याचे ठरवले.

पन्हाळा : चोरीच्या संशयावरून भोंदूबुवासमोर पत्नीची विवस्त्र पूजा केल्याचा धक्कादायक प्रकार पन्हाळा तालुक्यातील एका गावात घडला. यानंतर संबंधित महिलेने फिर्यादी दिली.

त्यानुसार पन्हाळा पोलिसांनी (Panhala Police) अमानुष, अनिष्ट व अघोरी व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत भोंदूबुवा रामू कोलकर ऊर्फ रामा मिस्त्री याच्यासह पती आणि सासूवर गुन्हा नोंद केल्याचे पन्हाळा पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी सांगितले.

पोलिसांनी सांगितले की, चार वर्षांपूर्वी घरातील सोन्याची चेन चोरीस गेली होती. त्याची चौकशी करण्यासाठी पीडितेचा पती भोंदूबुवाकडे गेला. तेव्हा त्याने ती चेन तुझ्या पत्नीने चोरून तिच्या आईला दिली आहे, असे सांगितले. दुसरीकडे भोंदूबुवा पीडितेकडे शरीर संबंधाची मागणी करीत होता. त्याला तिने दाद दिली नाही.

एक दिवस पतीने पीडितेला चोरीचा जाब विचारला व या संशयाची शहानिशा करण्यासाठी भोंदूबुवाच्या मदतीने पूजा करण्याचे ठरवले. त्यानुसार त्याने आईला सोबत घेऊन भोंदुबुवासमोर पत्नीची विवस्त्र पूजा केली. याबाबत महिलेने पन्हाळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. हा प्रकार ऑगस्टमध्ये घडला आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

करोडपती सासऱ्याने असं काय केलं की ३० वर्षीय सुनेनं थेट रचला कट, ६ लाखांची सुपारी देत संपवलं; धक्कादायक माहिती उघड

Nagara Road Accident : कामाच्या शोधात निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला! गोंदिया-बालाघाट मार्गावर ट्रक-पीकअपच्या धडकेत 6 जण ठार, 3 वर्षीय बालकाचाही समावेश; 7 गंभीर

Marathi News Live Updates : काल केसनंद, आज खराडी... ऐश्वर्या जाधव यांच्या लावणी कार्यक्रमाला पुन्हा परवानगी नाकारली!

२८ चेंडूंत १३६ धावा! Mumbai Indians च्या फलंदाजाची हवा; १७३ धावांच्या वादळी खेळीने वेधले जगाचे लक्ष, IPL 2027 गाजवण्यासाठी सज्ज

SCROLL FOR NEXT