Chandgad NCP Politics Kolhapur Marathi News
Chandgad NCP Politics Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

राष्ट्रवादीत कुपेकर गटाकडून स्वतंत्र अस्तित्वाचा प्रयत्न

सुनील कोंडुसकर

चंदगड : चंदगड विधानसभा मतदारसंघात माजी आमदार संध्यादेवी कुपेकर व डॉ. नंदिनी बाभुळकर यांना मानणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्वतंत्र अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. गोकुळ आणि जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर या निर्णयामुळे उत्सुकता निर्माण झाली आहे. 

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या तिकिटाचा अट्टाहास डॉ. बाभुळकर यांना महागात पडला. राष्ट्रवादीची उमेदवारी निश्‍चित असताना त्यांनी भाजपमधून उमेदवारीचा प्रयत्न केला. यामागे स्थानिक पातळीवरील राजकारणाचे पडसाद होते. पक्ष पातळीवरील निर्णय आणि तळ्यात मळ्यातली भूमिका याचा फटका यात बसला.

उमेदवारीच्या दृष्टीने दूरवर असलेल्या आमदार राजेश पाटील यांना यातुन राष्ट्रवादीची संधी चालून आली. स्थानिक पातळीवरील सर्व गोळाबेरीज करून त्यांनी या निवडणुकीत बाजी मारली. यामध्ये नेतृत्व म्हणून संध्यादेवी कुपेकर व आशीर्वाद म्हणून बाबासाहेब कुपेकर यांनाही स्थान देण्यात आले होते. निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर डॉ. बाभुळकर व माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी राजकारणापासून अलिप्त भूमिका स्वीकारली होती. गेले सुमारे वर्षभर त्यांचा राजकीय विजनवास होता.

परंतु नुकतीच कार्यकर्त्यांची चंदगड येथे बैठक घेऊन स्वतंत्र अस्तित्व दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आमदार राजेश पाटील गटाशी त्यांचे मतभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे. या बैठकीत डॉ. बाभुळकर यांनी मोबाईलवरून स्पीकर फोनद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यापुढील निवडणुका कुपेकर गट म्हणून लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे मतदारसंघातील राजकारणाला वेगळे वळण मिळाले आहे. हा प्रयत्न भविष्यात कितपत यशस्वी ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

पूर्णवेळ देण्याची मागणी 
बैठकीला उपस्थित काही कार्यकर्त्यांनी डॉ. बाभुळकर यांच्या वास्तव्याचा मुद्दा उपस्थित केला त्यांनी नागपूर सोडून मतदार संघात पूर्णवेळ द्यावा, अशी मागणी करण्यात आली याबाबत त्या काय निर्णय घेतात याकडेही लक्ष लागले आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : साताऱ्यात आज दिग्गजांच्या तोफा धडाडणार; शरद पवार, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात प्रचार सभा

Paneer Stuffed Chilla: विकेंडला बनवा पनीर स्टफ चिला, नोट करा रेसिपी

Sakal Podcast : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं नंदुरबार यंदा कोण जिंकणार? ते देशासमोर पाण्याचे संकट

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 04 मे 2024

SCROLL FOR NEXT