Cleaning of forest water bodies in Chandgad taluka
Cleaning of forest water bodies in Chandgad taluka 
कोल्हापूर

चंदगड तालुक्‍यातील जंगलातील पाणवठ्यांची स्वच्छता

सुनील कोंडुसकर

चंदगड ( कोल्हापूर) ः हिवाळ्यानंतर उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागल्या की झाडांची पानगळ सुरू होते. तळपत्या सूर्याच्या उष्णतेने पाण्याचे स्त्रोत आक्रसतात. उघड्यावर साठलेले ओहोळाचे पाणी आटू लागते. तहानेने व्याकुळ झालेल्या जंगलातील पशुपक्ष्यांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. येथील परिक्षेत्र वन अधिकारी डी. जी. राक्षे यांनी ही बाब हेरली. वन कर्मचारी आणि मजुरांच्या सहकार्याने त्यांनी जंगलातील पाणी साठे स्वच्छ करण्याबरोबर वाहणाऱ्या पाण्याची साठवणूक केली आहे. आता पावसाळ्यापर्यंत या पाणवठ्यांची देखभाल करण्यात येणार आहे. 
तालुक्‍यात चंदगड आणि पाटणे असे वन विभागाचे दोन विभाग पडतात. चंदगड परिक्षेत्रामध्ये कोकण सीमेवरील अतिपावसाचा भाग येतो. हे क्षेत्र जंगलाने व्यापलेले असले तरी खडकाळ भाग असल्याने उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासते. जंगलातील पाण्याचे स्त्रोत आटल्यामुळे वन्य प्राण्यांना ताम्रपर्णीच्या पात्राचा आधार घ्यावा लागतो. सायंकाळी पाणवठ्यावर येण्याच्या वेळी त्यांची शिकार होण्याचा धोका असतो. त्यामुळे जंगलातील पाण्याचे स्त्रोत जीवंत राहिल्यास वन्य प्राण्यांना सुरक्षितता लाभेल, या हेतूने राक्षे यांनी पाणवठे दुरुस्ती आणि स्वच्छतेची मोहीम आखली. वन कर्मचारी आणि वन मजुरांच्या मदतीने त्यांनी दोन दिवस कष्ट घेऊन हे काम पूर्ण केले. जंगलात ओहोळाच्या पात्रात जागोजागी साचलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणात झाडांची पाने पडली होती. ती कुजल्यामुळे प्राण्यांना पाणी पिणे अशक्‍य होते. अशा ठिकाणी पाण्यातीन पाने बाजूला काढण्यात आली. काही ठिकाणी जमिनीतून उगम पावलेले पाणी जमिनीवरून पाझरत वाहत होते. ते पीता येत नसल्याने त्याच्या चारही बाजूंनी दगडमातीचा भराव घालून ते अडवण्यात आले. त्यामुळे साचलेले पाणी पिण्यास सुलभ झाले आहे. पुढे पावसाळा सुरू होईपर्यंत या पाणवठ्यांची देखभाल केली जाणार असल्याचे राक्षे यांनी सांगितले. 

पाणी म्हणजे जीवन आहे. जंगली पशू, पक्षी आपली हद्द सोडून जंगलातून बाहेर येताना अत्यंत संवेदनशील असतात. पाण्यासाठी वनातून बाहेर आल्यास त्यांच्या जिविताला धोका असतो. शिकार होते. ते रोखण्याच्या हेतूने पाणवठ्यांची स्वच्छता केली आहे. 
- डी. जी. राक्षे, वनक्षेत्रपाल, चंदगड

संपादन - यशवंत केसरकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Election : बाबाजी‘ फॅक्टरमुळे नाशिकमध्ये ‘काटे की टक्कर', शेवटच्या दोन दिवसात आले महत्व

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात एल एम सरदार हायस्कूल येथील ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ

Mobile Hacks: 'या' सोप्या ट्रिक्स वापरा, मोबाईलमधील फोटो डिलिट करण्याची येणार नाही वेळ

Lok Sabha Election: विरोधकांनीही मुस्लिम उमेदवारांना ठेवले दूर! 2019 च्या तुलनेत 2024 ची स्थिती काय?

RCB vs CSK: धोनीच्या षटकारामुळे रिंकूची आठवण... CSK विरूद्ध शेवटच्या ओव्हरला काय होत्या भावना, यश दयालच्या वडिलांकडून खुलासा

SCROLL FOR NEXT