Clerk dies bhadgaon accident case kolhapur
Clerk dies bhadgaon accident case kolhapur 
कोल्हापूर

भडगावजवळील घटना; उसाने भरलेली चालती ट्रॉली दुचाकीस्वारावर कोसळली लिपिक जागेवरच ठार

सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज (कोल्हापूर) : गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गावरील भडगाव (ता. गडहिंग्लज) जवळ दुचाकीस्वारावर उसाने भरलेली ट्रॉली कोसळली. ऊस आणि ट्रॉलीखाली दबून कादर आदम कोवाडकर (वय ४५, अडकूर, ता. चंदगड) जागीच ठार झाले. रविवारी (ता. २२) रात्री साडेनऊ ते साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, ट्रॅक्‍टरचालक दुरदुंडी फडके (रा. तेरणी, ता. गडहिंग्लज) याच्या विरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.


पोलिसांनी सांगितले, रविवारी रात्री कादर मोटारसायकल (एमएच ०९, एएन ९२७६) ने गडहिंग्लजहून अडकूरकडे जात होते. त्याचवेळी चालक दुरदुंडी फडके उसाने भरलेला ट्रॅक्‍टर (एमएच ०९, सीजे ७३१७) भरधाव वेगाने गडहिंग्लज साखर कारखान्याकडे नेत होता. कादर ट्रॅक्‍टरच्या मागे होते.

भडगाव फाट्याजवळच्या सर्व्हिसिंग सेंटरसमोर ट्रॅक्‍टरची बाजू काढताना ट्रॉलीच्या चाकाचा ॲक्‍सल तुटला. यामुळे बाजू काढणारे दुचाकीस्वार कादर यांच्या अंगावर मागील ट्रॉली व त्यातील ऊस कोसळला. त्याखाली ते दबले गेले. त्यामुळे कादर जागीच ठार झाले. मोटारसायकलचाही चक्काचूर झाला आहे. याबाबत आसद कोवाडकर यांनी फिर्याद दिली आहे. 

संपादन अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrikant Shinde: एक ठाकरे धनुष्य बाणाला तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला करणार मतदान, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: मोदींच्या कितीही सभा घेतल्या तरी उपयोग होणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

Wagholi Accident: नवीन कारचा आनंद काही काळच टिकला! पुण्यात भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

SCROLL FOR NEXT