कोल्हापूर

दिवाळी-पाडवा खरेदीचा  आज उत्सव 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर  : दीपोत्सवाचा उत्साह आता टीपेला पोचला असून उद्या (सोमवारी) दिवाळी पाडवा व भाऊबीजेचा सण साजरा होणार आहे. यानिमित्ताने विविध ऑफर्सचा खजीना उपलब्ध असल्याने बाजारपेठेत खरेदीचा उत्सवच साजरा होणार आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अधिक गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेत सर्व प्रतिबंधात्मक नियमांची काटेकोर अंमलबजावणी होणार आहे. 
स्मार्टफोन, इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू, सोने-चांदी दागिन्यांपासून ते ऑटोमोबाईल क्षेत्राबरोबरच रिअल इस्टेट क्षेत्रातही विविध ऑफर्स असून ई-बाईक्‍ससाठी तब्बल दहा हजार रूपयांपर्यंतचा डिस्काऊंट दिला जाणार आहे. सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत, तरीही फायदेशीर व सुरक्षित गुंतवणूक म्हणून आजही सोन्यालाच पहिली पसंती मिळते. त्यामुळे यंदाही सोन्याची नाणी, वळे व शिक्के खरेदी करून गुंतवणूक केली जाणार आहे. मुहूर्तावर गुंजभर का होईना, सोने खरेदीची परंपराही जपली जाणार आहे. 
यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जाहीर झालेल्या लॉकडाऊन काळात सर्वच व्यवहार ठप्प राहिले. मात्र, दसरा-दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठेत खरेदीला उधाण आले आणि एकूणच अर्थचक्राला चालना मिळाली. त्यातही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सवलतींच्या विविध योजना, सुलभ कर्ज योजनांसारख्या अनेक ऑफर्स बाजारपेठेत उपलब्ध असल्याने खरेदी आणखी वाढणार आहे. विविध फायनान्स कंपन्यांकडून शून्य टक्के व्याजदराच्या ऑफर्सही आहेत. तरुणाईचा ओढा स्मार्टफोन खरेदीकडे असल्याने मोठ्या प्रमाणावर स्मार्टफोनची खरेदी होईल, असा अंदाज आहे. डायनिंग टेबल, सोफासेट, शोकेस, बेड, वॉर्डरोब आदी फर्निचर खरेदीच्या पार्श्‍वभूमीवर त्यातील अनेक प्रकारची व्हरायटी उपलब्ध आहे. 

घरपोच डिलीव्हरीही... 
जितके सोने तितकी चांदी भेट, शून्य टक्के व्याज दरात वित्तीय सहाय्य, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू खरेदीवर विविध भेटवस्तू अशा अनेक ऑफर्स बाजारात उपलब्ध आहेत. त्याशिवाय घरातूनच बुकींग व घरपोच डिलीव्हरी अशी सुविधाही काही शोरूम्सनी उपलब्ध केली आहे. एकूणच पाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीला उधाण येणार आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूला दुसरा धक्का! अर्धशतकानंतर डू प्लेसिस आऊट, पण विकेटमुळे झाला ड्रामा

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT