DP adorned with "Valentine" message
DP adorned with "Valentine" message 
कोल्हापूर

"व्हॅलेंटाईन' संदेशाने सजले डीपी 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : सोशल मीडियावर शुभेच्छा देत व सामाजिक उपक्रम करत "व्हॅलेंटाईन डे' आज साजरा झाला. अनेकांचे डीपी व स्टेटस प्रेमाच्या संदेश देत सजले. रक्तदान करत तरूणाईने सामाजिक बांधिलकी जपली. 

"व्हॅलेंटाईन डे'चे सेलिब्रेशन जोरदार झाले. मित्र-मैत्रिणींनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. ग्रिटिंग्ज पाठवूनही मनातल्या भावना व्यक्त करण्यात आल्या. आई, वडिल, भाऊ, बहिणीवरील प्रेमाचा धागा अतूट असल्याची प्रचिती देण्यात आली. फेसबूकवर व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा अनेकांनी देत कविता, शायरीच्या ओळीही झळकविल्या होत्या. "व्हॅलेंटाईन डे'ची माहिती सांगणारे मेसेजही व्हॉटसऍपद्वारे दिवसभर फिरत राहिले. शहरातील हॉटेल्समध्ये कॅंडल डीनरचा आनंद अनेकांनी लुटला. शालेय व महाविद्यालयांनी एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. 

युवा ऑर्गनायझेशनतर्फे राजारामपुरीतील राजाराम गार्डनमध्ये रक्तदान शिबिर झाले. यात 521 रक्तदात्यांनी रक्तदान केले. उपक्रमाचे यंदाचे पंधरावे वर्ष होते. सोनल शिर्के, सत्यजित जाधव, विक्रम आमले, मंदार तपकिरे, सुमंत खराडे, अनकेत कोरगावकर, अभिजित पसारे, रोहित देसाई, अनंत चौगुले, मुदृल शहा, कौस्तुभ कोतमिरे यांनी संयोजन केले. 
इंडियन मार्शल आर्ट थांग-ता असोसिएशनतर्फे कसबा बावड्यातील ऊसतोड शेजमजुरांना कपडे व त्यांच्या मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. सुमारे पस्तीस कुटुंबियांना कपडे देण्यात आली. या वेळी सचिव सतीश वडणगेकर, माजी नगरसेवक अफजल पिरजादे, मोहन ढवळे, आकाश माडगूळकर, निखिल मोरे, अमोल पाटोळे, महादेव देवाडकर, संजय देवाडिगा उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीने गमावली नववी विकेट, 150 धावांचा टप्पा गाठणार?

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT