इचलकरंजी पालिकेला महावितरणचा इशारा
इचलकरंजी पालिकेला महावितरणचा इशारा 
कोल्हापूर

इचलकरंजी पालिकेला महावितरणचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी : येथील पालिकेच्या विविध विभागाचा विद्युत पुरवठा खंडीत होण्याची धोका निर्माण झाला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून वीज बील न भरल्यामुळे महावितरण कंपनीकडून तगादा लावण्यात आला आहे. पंधरा दिवसांत थकबाकी न भरल्यास वीज पुरवठा खंडीत करण्याचा इशारा महावितरणकडून देण्यात आला आहे. पालिकेची सद्या आर्थिक परिस्थीती अत्यंत नाजूक आहे. त्यामुळे थकबाकी भरतांना मोठी कसरत करावी लागणार आहे. सद्या तरी वीज पुरवठा खंडीत होण्याची नामुष्की टाळण्यासाठी थोडीफार रक्कम महावितरणला देण्याबाबत पालिका प्रशासनाकडून हालचाली सुरु असल्याचे सांगण्यात आले.

पालिकेला सहाय्यक अनुदानात मोठी कपात झाली आहे. त्यामुळे पालिकेवर आर्थिक अरिष्ट कोसळले आहे. सहाय्यक अनुदानातून कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचा-यांची देणी दिल्यानंतर उर्वरीत रक्कमेतून अत्यावश्यक सेवेची बिले दिली जात होती. पण वेतना ऐवढेच सहाय्यक अनुदान येत आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेची बिले भरतांना पालिका प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे. यामध्ये साधारणपणे गेल्या तीन महिन्यांपासून महावितरणची बिले भरलेली नाहीत. पालिकेच्या विविध विभागाची सुमारे दोन कोटीहून अधिक वीज थकबाकी आहे. थकबाकी वसुलीसाठी महावितरण कंपनीकडून पालिकेकडे सातत्यांने तगादा सुरु आहे. महावितरणच्या अधिका-यांनी पालिका प्रशासनाची भेट घेवून थकबाकी भरण्याबाबत सूचना केली आहे. तर यापूर्वीच नोटीसही दिली असून पंधरा दिवसांत थकबाकी न भरल्यास वीज पुरवठा खंडीत करण्याचा इशारा दिला आहे.

घरफाळा वसुलीवरच मदार

सद्या घरफाळा वसुली हेच सर्वात मोठे उत्पन्न आहे. पण त्याला अधिक गती आलेली नाही. दररोज फक्त एक ते दोन लाख रुपये इतकाच घरफाळा जमा होत आहे. डिसेंबरनंतर घरफाळा वसुलीला गती येणार आहे. सद्या पालिकेकडे अत्यंत कमी निधी शिल्लक आहे. त्यामुळे महावितरणची थकबाकी कशी भरायची, असा गंभीर प्रश्न प्रशासनासमोर उभा आहे.

कारवाईची टांगती तलवार कायम

महावितरण कंपनीकडून थकबाकी भरण्याबाबत सातत्यांने पाठपुरावा सुरु आहे. जर थकबाकी न भरल्यास वीज पुरवठा खंडीत केला जाण्याची भिती कायम आहे. राज्यातील अनेक पालिकांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. त्यामुळे ही कारवाई टाळण्यासाठी थोडीफार रक्कम भरण्याबाबत पालिका प्रशासनाकडून हालचाली सुरु आहेत.

पाणी पुरवठा विभागाची सर्वाधिक थकबाकी

पाणी पुरवठा विभागाची सर्वाधिक सुमार दीड कोटी इतकी थकबाकी आहे. यामध्ये जलशुध्दीकरण केंद्र, पंचगंगा नळपाणी योजना, कृष्णा नळपाणी योजना, सार्वजनिक कूपनलिका, मलःनिस्सारण केंद्र यांचा समावेश आहे.

अन्य थकबाकी अशी..

स्ट्रीट लाईट - ४० लाख

नाट्यगृह - ८ लाख

सर्व इमारती - १२ लाख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : साताऱ्यात आज दिग्गजांच्या तोफा धडाडणार; शरद पवार, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात प्रचार सभा

Paneer Stuffed Chilla: विकेंडला बनवा पनीर स्टफ चिला, नोट करा रेसिपी

Sakal Podcast : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं नंदुरबार यंदा कोण जिंकणार? ते देशासमोर पाण्याचे संकट

SCROLL FOR NEXT