Crime News esakal
कोल्हापूर

Kolhapur Crime : धक्कादायक! कपडे घेण्यासाठी पैसे मागितले म्हणून पत्नीला पाजलं फिनेल; पतीसह सासू-सासऱ्यांना अटक

गौतमी यांच्या जबाबावरुन रोहित, रेखा व भीमराव यांच्यावर गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

औषध पिण्यास नकार दिल्यानंतर मारहाण केली व जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे जबाबात म्हटले आहे.

गडहिंग्लज : चिंचेवाडी (ता. गडहिंग्लज) येथे विवाहितेला फिनेलसदृश औषध पाजल्याची घटना घडली. गौतमी रोहित कांबळे (वय २३) असे उपचार सुरु असलेल्या विवाहितेचे नाव आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांनी दिलेल्या जबाबावरुन पतीसह तिघांना अटक करण्यात आली आहे.

पती रोहित भीमराव कांबळे (वय २१), सासू रेखा भीमराव कांबळे (वय ४५) व सासरा भीमराव बाबू कांबळे (वय ५२) अशी संशयितांची नावे आहेत. गौतमी कांबळे यांना गुरुवारी (ता.७) येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

त्यावेळी त्यांनी नजरचुकीने फिनेल पिल्याचे सांगितले होते. दरम्यान, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याचे पोलिसांना कळविले. त्यामुळे त्यांचा जबाब नोंदविण्याचा आदेश देण्यात आला. निवासी नायब तहसीलदार विष्णू बुट्टे यांनी हा जबाब घेतला.

बुधवारी (ता.६) रात्री दहाच्या सुमारास पती रोहित याच्याकडे कपडे घेण्यासाठी दोन हजार रुपये मागितले म्हणून राहुलसह सासू रेखा व सासरा भिमराव यांनी फिनेलसदृश औषध जबरदस्तीने पाजल्याचा जबाब गौतमी यांनी दिला आहे. औषध पिण्यास नकार दिल्यानंतर मारहाण केली व जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे जबाबात म्हटले आहे. गौतमी यांच्या जबाबावरुन रोहित, रेखा व भीमराव यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT