Gruhalakshmi Scheme : कामाची बातमी! गृहलक्ष्मी योजनेची रक्कम आता पोस्ट खात्यात होणार जमा; 'या' कारणामुळं सरकारनं घेतला निर्णय

पोस्ट खात्याशी आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे.
Gruhalakshmi Scheme Women
Gruhalakshmi Scheme Womenesakal
Summary

सध्या अनेक कुटुंब प्रमुख महिलांच्या बँक खात्यावर डीबीटीद्वारे रक्कम जमा होत आहे.

बेळगाव : राज्य सरकारच्या गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत (Gruhalakshmi Scheme) अर्ज केलेल्या महिलांना या महिन्यांपासून दोन हजार रुपये बँक खात्यात जमा होत आहेत. परंतु, अनेक महिलांना (Women) रक्कम जमा होण्यास तांत्रिक अडचणी निर्माण होत आहे. यामुळे ज्या कुटुंबप्रमुख महिलांच्या नावाने पोस्ट खात्यात (Post Account) बचत खाते (सक्रिय) आहे.

त्यांच्या पोस्ट खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे. अनेकांची बँक खाते असली तरी निष्क्रिय झाली आहेत. तर अन्य कारणामुळे रक्कम जमा होण्यास तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. यासाठी अर्ज केलेल्या ज्या महिलांचे पोस्ट बचत खाते आहे, अशा पोस्ट खात्यात गृहलक्ष्मी योजनेची रक्कम जमा केली जाणार आहे.

Gruhalakshmi Scheme Women
Maratha Reservation : PM मोदीच मराठ्यांना आरक्षण देऊ शकतात, कारण..; शाहू छत्रपती महाराजांचं मोठं विधान

यामुळे योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या महिलांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सध्या अर्ज केलेल्या बऱ्याच महिलांना रेशनकार्ड, आधार कार्ड, बँक खात्याशी आधार लिंक करणे, तर बँक खाते निष्क्रिय असणे, याशिवाय अन्य तांत्रिक कारणामुळे योजनेअंतर्गत रक्कम जमा होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. शिधापत्रिकांमध्ये आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी १४ सप्टेंबर अखेरची तारीख आहे.

Gruhalakshmi Scheme Women
Prakash Awade : आंदोलनाची गरज नाही, सुळकूडचे पाणी इचलकरंजीला मिळणारच; आमदार आवाडेंचा कोणाला इशारा?

परंतु, वारंवार होणाऱ्या सर्व्हर समस्येमुळे ही कामे लवकर होत नसल्याने अर्जधारक महिलांना योजनेपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. यासाठी प्रशासनाने ज्यांची पोस्ट खात्यात बचत खाती सक्रिय आहेत. अशा खात्यांमध्ये ‘गृहलक्ष्मी’ची रक्कम जमा करण्यात येणार आहे.

Gruhalakshmi Scheme Women
Bhaskar Jadhav : 'त्यांना वेस्ट इंडिजच्या क्रिकेटपटूची उपमा दिली की राग येतो'; जाधवांचा बावनकुळेंवर निशाणा

या पोस्ट खात्याशी आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. सध्या अनेक कुटुंब प्रमुख महिलांच्या बँक खात्यावर डीबीटीद्वारे रक्कम जमा होत आहे. परंतु, तांत्रिक समस्येमुळे अर्ज केलेल्या अनेक महिला या योजनेपासून वंचित राहू लागल्या आहेत. याबाबत महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यापर्यंत तक्रारी पोहोचल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com