In Ichalkaranji Marigold Rs 250 Per Kg Kolhapur Marathi News
In Ichalkaranji Marigold Rs 250 Per Kg Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

इचलकरंजीत झेंडू 250 रुपये किलो

ऋषीकेश राऊत

इचलकरंजी : अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दसऱ्यामुळे अच्छे दिन आले. यंदाच्या दसऱ्याला झेंडूला विक्रमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त झाले. सकाळी 80 ते 100 रूपये प्रतिकिलो झेंडूचा भाव होता. दुपार सरली तसा भाव चांगलाच कडाडला. दुपारी झेंडूच्या दराने 200 गाठले आणि सायंकाळी प्रतिकिलो दर 250 ते 300 रूपये होता. 

दसऱ्याचा बाजार म्हणजे झेंडू फुलाला अधिक महत्व असते. मात्र यावर्षी परतीच्या पावसाचा फटका फुल शेतीला बसला. त्यामुळे ऐन दसऱ्याच्या तोंडावर फुल उत्पादनातून स्थिरावणारे शेतकरी हवालदिल झाले होते. परंतु शेतकऱ्यांनी हार न मानता पावसातून उरल्या सुरल्या हातासरशी आलेल्या झेंडूच्या शेतीत चांगले नियोजन केले. दसऱ्याला खंडेनवमीसाठी घरोघरी, कार्यालयात झेंडू फुलांना मागणी असते. यंदा बाजारात फुलांची आवक कमी प्रमाणात झाल्यामुळे झेंडूला तेजी आली. याचा फायदा झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना झाला. 

बाजारात यंदा झेंडूची कमी झालेली आवक, मागणीची पुर्तता न होण्यासारखी होती. झेंडू विक्रेत्यांची संख्याही कमी होती. शहरातील ठिकठिकाणी किरकोळ विक्रेते विक्री करताना दिसत होते. 

उत्तम दर मिळाल्याने समाधान
पावसाने झेंडू फुलशेती नुकसानीला बळी पडली. दसऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर जोमाने कामाला लागून उत्तम नियोजन केले. उत्तम दर मिळाल्याने समाधान आले. पहिल्यांदाच झेंडूमुळे चांगला नफा मिळाला. 
- शुभम यादव, शेतकरी 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूला दुसरा धक्का! अर्धशतकानंतर डू प्लेसिस आऊट, पण विकेटमुळे झाला ड्रामा

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT