Ichalkaranjit crosses hundreds of corona patients
Ichalkaranjit crosses hundreds of corona patients 
कोल्हापूर

इचलकरंजीत कोरोना रुग्णांचे शतक पार : संख्या पोहोचली १०१ वर....

पंडीत कोंडेकर

इचलकरंजी (कोल्हापूर)  : शहरात आज कोरोना रूग्णांच्या संख्येने शतक पार केले. सोलगे मळा येथील नवीन तीन रुग्ण आज पॉझिटिव्ह आले. त्यामुळे रुग्णांची संख्या १०१ वर पोहोचली आहेृ दुसरीकडे कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासादायक बाब पुढे येत आहे.


 शहरात गेल्या पंधरा दिवसात कोरोनाने कहरच केला आहे. दररोज रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कुडचे मळा येथे सामूहिक संसर्गाला सुरुवात झाल्यानंतर आज शहरातील विविध भागात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. शहरातील विविध भागात ३० पेक्षा अधिक प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आले आहेत. शहरात सरासरी दररोज सहा ते सात रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. घर टू घर सर्व्हे करून संशयास्पद रुग्णांची माहिती घेतली जात आहे.  विविध भागात औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण केले जात आहे. संसर्ग टाळण्यासाठी गेली चार दिवस शहरात शंभर टक्के लॉक डाऊन जाहीर करण्यात आले आहे. १४ जुलैपर्यंत शहर शंभर टक्के लॉक डाऊन राहणार आहे.


 दरम्यान, आज सोलगे मळ्यातील नवीन तीन रुग्ण आढळून आले आहेत. यापूर्वीच या भागातील दोन रुग्ण कोरोना बाधित झाले आहेत. त्यांच्या संपर्कातील तिघांना संसर्ग झाल्याचे  प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येने आज शंभरी पार केली आहे. रुग्णांची संख्या १०१ वर पोहचली आहे. तर आतापर्यंत शहरातील एका तरुणांसह नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.

पोलीस अधिकारी निगेटिव्ह

लॉक डाऊन  करण्यासाठी शहर सनियंत्रण समितीने आयोजित बैठकीस उपस्थीत असलेल्या माजी नगरसेवकास कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे सर्व उपस्थितांना १४ दिवस होम क्वारंटाईन करण्याचा आदेश प्रशासनाकडून देण्यात आला होता. यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांसह एका कर्मचार्‍याचा स्वॅब तपासणीसाठी देण्यात आला होता. या चौघांचाही अहवाल निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीने गमावली नववी विकेट, 150 धावांचा टप्पा गाठणार?

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT