Jotiba Dongar Chitra yatra
Jotiba Dongar Chitra yatra Sakal
कोल्हापूर

जोतिबावर चैत्र यात्रेस प्रारंभ; सासनकाठ्यांसह भाविकांच्या झुंडी

निवास मोटे

श्री क्षेत्र जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा मुख्य दिवस शनिवार (ता. १६) असला तरी आज कामदा एकादशीच्या मुहूर्तावर जोतिबा चैत्र यात्रेस पारंपरिक पद्धतीने प्रारंभ झाला.

जोतिबा डोंगर - श्री क्षेत्र जोतिबा (Jotiba) देवाच्या चैत्र यात्रेचा (Chitra Yatra) मुख्य दिवस शनिवार (ता. १६) असला तरी आज कामदा एकादशीच्या मुहूर्तावर जोतिबा चैत्र यात्रेस पारंपरिक पद्धतीने प्रारंभ (Start) झाला. राज्यभरातून भाविक (Divotee) येण्यास सुरुवात झाली. आज सकाळी गायमुख तलावमार्गे दक्षिण दरवाजातून बेळगावचे भाविक आले. अन्य राज्यांच्या भाविकांनी डोंगरावर हजेरी लावली. सात दिवस पायपीट करून बैलगाडी घेऊन आलेल्या कर्नाटकातील भाविकांचेही आगमन झाले.

आज आलेल्या भाविकांचे ग्रामस्थ पुजारी व देवस्थान समितीच्या वतीने मानाचा विडा देऊन स्वागत केले. जोतिबाच्या नावानं चांगभलंचा जयघोष झाला. भाविकांनी मंदिरांच्या शिखरावर गुलाल खोबऱ्याची उधळण केली. बेळगाव येथील भाविकांनी पाण्याची टाकी नवीन वसाहतीमध्ये राहण्याची जागा केली. काहींनी पाण्याची टाकी शेजारच्या रस्त्याकडेला बैलगाड्या सोडून आडोसा केला. आज सोलापूर, आंबेजोगाई, परळी, बीड, तुळजापूर, नंदूरबार या भागांतील भाविक सासनकाठीसह दाखल झाले. हलगी पिपाणी सनईच्या सुरात वाजत मंदिरात आणली. चांगभलचा त्यांनी अखंड जयघोष केल्यामुळे मंदिर परिसर दणाणून गेला. भाविक गुलालात न्हाऊन गेलेत. आज कामदा एकादशीच्या निमित्ताने दुपारी श्री जोतिबा देवाची विठ्ठल रूपातील महापूजा मधुकर सांगळे, अंकुश दादर्णे, बाळकृष्ण सांगळे, नितीन लादे यांनी ही महापूजा बांधली.

सीसीटीव्हीची नजर

चैत्र यात्रेत मंदिर व परिसराचे चित्रण करण्यासाठी देवस्थान समितीने सीसीटीव्ही यंत्रणा बसविली आहे. त्यामुळे घातपाताच्या घटनांना आळा बसणार आहे.

शुक्रवारपासून अवजड वाहने बंद

चैत्र यात्रा काळात शुक्रवार ते सोमवारपर्यंत अवजड वाहनांना बंदी घातली आहे. डोंगरावर जाणारी ट्रक, तीन चाकी प्रवासी व मालवाहतूक रिक्षा तसेच ट्रॅक्टरला बंदी घातली आहे.

शासकीय यंत्रणा डोंगरावर

डोंगरावरील कामे मार्गी लावण्यासाठी गटविकास अधिकारी, तीन विस्तार अधिकारी, सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, देवस्थानचे सचिव, अधीक्षक, पोलिस परिश्रम घेत आहेत.

पार्किंग सज्ज

वाहन पार्किंगची व्यवस्था शासकीय विश्रागृहासमोर, यमाई मंदिर परिसर, चव्हाण तळे परिसर तसेच डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या रिकाम्या जागेत केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : देशभरात संध्याकाळी पाचपर्यंत ५६.६८ टक्के मतदान; महाराष्ट्रात जम्मू काश्मीरपेक्षाही कमी मतदान शिंदे

Ebrahim Raisi : इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

SCROLL FOR NEXT