jyotiba temple 1 lakh people visited
jyotiba temple 1 lakh people visited  
कोल्हापूर

डोंगर हाऊसफुल्ल: जोतिबा डोंगरावर एक लाख भाविक

निवास मोटे

 जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी तथा जोतिबाचा डोंगर ता. पन्हाळा येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या दर्शनसाठी आज दिवसभरात  राज्यभरातून सुमारे एक लाख भाविकांनी डोंगरावर गर्दी केली. 


त्यामुळे डोंगरावर खेट्याचे स्वरूप प्राप्त झाले. आज रविवार असल्याने पहाटेपासून डोंगरावर भाविक येण्यास सुरुवात झाली .
सकाळी ७ ते २ आणि दुपारी ४ ते सांयकाळी ८ या वेळेतच मुख्य मंदिरात दर्शनासाठी सोडण्यात आले. कामधेनू गाय जवळ असणाऱ्या दरवाजातून भाविकांना सोडण्यात येत होते व दक्षिण दरवाजातून बाहेर येण्याचा मार्ग होता. त्यामुळे  मोठी गर्दी असल्यामुळे रांगेतून भाविकांनी दर्शन घेतले पण अन्य भाविकांना मात्र कळस दर्शनावरच समाधान मानावे लागले. नियम व अटीनूसार  भाविकांना दर्शनाचा लाभ झाला .


 भाविक मुख्य मंदिरात जाताना मास्क  व  सॅने टायझर लावून जात होते पण मंदिराच्या बाहेर मात्र सोशल ड्रिस्टन्सचा फज्जा उडालेला दिसत होता. डोंगर महीन्यापासून गर्दीने फुलून गेला आहे.  मंदिर उघडल्या नंतरच्या आज पाचव्या रविवारी ही गर्दी कायम आहे.  दिवसभर भाविकांच्या झुंडी येत राहील्या. मंदीरात आज सकाळी पाद्य पूजा , काकड आरती ,मुख मार्जन या विधीनंतर मंगलपाठ झाले . अभिषेकावेळी केदार स्त्रोत, केदार कवच यांचे पठण झाले. त्यानंतर सकाळी जोतिबा देवाची सांलकृत महापूजा बांधण्यात आली .

मंदिर उघडल्यानंतरचा 
 आजचा पाचवा रविवार मुळे दिवसभरात लाखाच्या आस पास भाविक दर्शनाच्या ओढीने डोंगरावर आले . पण नियम व अटी नुसार  भाविकांनाच दर्शन घेता आले . इतर भाविकांनी मात्र मुख दर्शन कळस दर्शन घेतले.

महादेव दिंडे,.अधिक्षक पश्चीम महाराष्ट्र देवस्थान समिती जोतिबा डोंगर

 अनेक भाविकांनी आज आपल्या कुटुंबासहित जोतिबा डोंगरावर हजेरी लावली व देवाचे दर्शन घेतले. पण सर्व भाविकांनी  सोशल डिस्टन्स पाळणे फारच गरजेचे आहे. आज तर ऐंशी टक्के भाविक डोंगरावर बिनधास्त  ये जा करताना दिसत होते. कोरोना संसर्गाचे त्यांना ध्यान असणे अवश्यक आहे.

संपादन- अर्चना बनगे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 DC vs RR Live Score: संजू सॅमसनचे दमदार अर्धशतक, राजस्थानच्या १०० धावाही पार

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT