Know the importance of oxygen in the blood in time 
कोल्हापूर

रक्तातील ऑक्‍सिजनचे महत्व वेळीच जाणा, प्रमाण कमी झाल्यास जिवितास धोका

शिवाजी यादव

कोल्हापूर ः सुरेशराव 55 वर्षांचे, फारसे कधी आजारी नव्हते, पण अचानक त्यांना दम लागल्यासारखे वाटले. थोडा घाम आला, शरिराने त्यांना वेगळीच चाहूल दिली. तसे ते तातडीने रूग्णालयात गेले. त्यांची ऑक्‍सिजन पातळी कमी झाली होती. दवाखान्यात दाखल झाले. ऑक्‍सिजन, औषध घेतली. आठ दिवसात सुरेशराव ठणठणीत बरे झाले. त्याच वयाचे केरबा यांनाही अशीच लक्षणे होती. मात्र सुरवातीला "हुईल बरं, दाखवू आज, उद्या' करीत केरबाने लक्षणांकडे दुर्लक्ष केले. एक दिवस ते बेशुध्द पडले तेव्हा दवाखान्यात आणले, प्रयत्नांची शर्त झाली. अखेर त्यांना मृत्यूने गाठले. 
सीपीआर रुग्णालयातील कोरोना रुग्णांची प्रतिनिधीक उदाहारणे. सीपीआरच्या हृदयशस्त्रक्रिया विभागाने कोरोना काळातील गंभीर रुग्णांची अवस्था नोंदवली असल्याचे डॉ. अक्षय बाफना यांनी हृदयरोग दिनाच्या निमित्ताने सांगितली. शरिर आपल्याला लक्षणे सांगत असते, ते पटकन ओळखून वेळीच दवाखान्यात येतात, त्यांचे जीव वाचलेत, मात्र लक्षणांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांच्या जीवावर बेतले. यात 33 टक्के रुग्ण उशिरा आले, त्यातील 20 टक्‍के व्यक्तींना मृत्यू गाठल्याचे डॉ. बाफना यांनी सांगितले. 
ऑक्‍सिजन कमी पडण्या बाबत डॉ. बाफना म्हणाले की, ""रक्तपेशी लाल असतात, श्‍वासाव्दारे ऑक्‍सिजन फुप्फुसात येतो, फुप्फुसातील रक्तात. अशुध्द रक्त असते, तेच रक्त हृदयाच्या उजव्या बाजूला येऊन डाव्याबाजूने शुध्दीकरणासाठी जाते. येथे श्‍वासातून घेतलेल्या ऑक्‍सिजनमधील कार्बनडॉय ऑक्‍साईड बाहेर टाकला जातो. शिल्लक शुध्द रक्ताचा डाव्याबाजूने रक्तवाहिन्याव्दारे स्नायू व हृदयाला रक्त पुरवठा होतो. यासर्व प्रक्रीयेसाठी फुप्फुसात ऑक्‍सिजन पुरेसा असावा लागतो.'' 
जंतू संसर्गामुळे फुप्फुसाची क्षमता कमकूवत झालेल्यांचे रक्‍त पुरेषा प्रमाणात रक्त हृदयाकडे जात नाही तेव्हा ऑक्‍सिजन कमी पडून धाप लागू शकते. तेव्हा अन्य आजारांची लक्षणेही तीव्र होतात. 

ऑक्‍सिजन कमी हृदय, मेंदूला झटका 
बंदिस्त खोलीत 21 टक्के ऑक्‍सिजन असतो. तर उंचावर ऑक्‍सिजनची पातळी 16 टक्‍क्‍यापर्यंत खाली येते. तेव्हा रक्तातून पुरेषा ऑक्‍सिजन अभावी रूग्ण गंभीर होतो. त्यांना बाहेरून ऑक्‍सिजन दिला जातो. फुप्फुस अगदीच कमकवूत असल्यास एक दोन दिवस जर स्नायूना पुरसे रक्त मिळाले नाही तर स्नायू मरतात. रक्तपेशीतील ऑक्‍सिजन खऱ्या अर्थाने स्नायूचे अन्न आहे. ते न मिळाल्याने ऑक्‍सिजन पातळी कमी होते. तेव्हा मेंदूला रक्त कमी पडते, तेव्हा रूग्ण कोम्यात जाण्याची शक्‍यता असते, तसेच ब्लॉकेजमुळे हृदयालाही रक्त पुरवठा कमी पडून हृदयविकाराचा झटका तीव्र येऊ शकतो. 

.... यांच्यासाठी अधिक धोका 
तीव्र मधूमेह, लकवा, कर्करोग, किडणीचे विकार, न्युमोनिया आदी आजारांच्या रूग्णांना मोठा धोका आहे. त्यांना ऑक्‍सिजन कमी पडून धाप लागू शकते. यावर तातडीने उपचार करून घेणे आवश्‍यक आहे. वेळीच उपचार घेतल्याने गंभीर अवस्थेतील व्यक्तीही बऱ्या झाल्या आहेत. असेही डॉ. बाफना यांनी सांगितले. 

संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT