Kolhapur district police force announces presidential medal to officers kolhapur marathi news
Kolhapur district police force announces presidential medal to officers kolhapur marathi news 
कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा पोलिस दलातील या अधिकार्यांना झाले राष्ट्रपती पदक जाहिर...

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - जिल्हा पोलिस दलात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पोलिस उपनिरीक्षक मधुकर चौगुले आणि सहायक फौजदार रवींद्र नुल्ले यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले. नुल्ले यांना दुसऱ्यांदा हे पदक मिळाले.

पोलिस उपनिरीक्षक मधुकर चौगुले यांना राष्ट्रपती पदकाचा सन्मान

शहर वाहतूक नियंत्रण शाखेत उपनिरीक्षक म्हणून मधुकर मारुती चौगुले हे मूळचे गारगोटीचे आहेत. १ मार्च १९८५ ला ते पोलिस दलात भरती झाले. त्यांनी लक्ष्मीपुरी, करवीर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, राधानगरी, हुपरी, राजारामपुरी, महामार्ग वाहतूक, नागरी हक्क संरक्षण केंद्र, पोलिस मुख्यालय आदी ठिकाणी सेवा बजावली. राजारामपुरी पोलिस ठाणे येथे कार्यरत असताना संशयित गुंड प्रशांत शिंदे याच्या टोळीस अटक केली होती. जबरी चोरी व खुनाचे सहा गुन्हे त्यांनी या टोळीकडून उघडकीस आणले होते. जिल्ह्यात गाजलेल्या भय्या महाडिक, दत्ता सामंत, बांदिवडेकर खुनातील संशयितांना पकडण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. त्यांचे पोलिस क्रीडा क्षेत्रातही योगदान लाभले आहे. हॉकी व फुटबॉल स्पर्धेत त्यांनी सात वेळा चॅम्पियनशिप घेतली. चौगुले यांना २०१५ मध्ये पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह मिळाले आहे.

पोलिस उपनिरीक्षक  रवींद्र नुल्ले यांना दुसऱ्यांदा हे पदक 

महामार्ग पोलिस नियंत्रण कक्षात काम करणारे सहायक फौजदार रवींद्र मालगोंडा नुल्ले हे मूळचे नानीबाई चिखली (ता. कागल) येथील आहेत. ते १९८५ मध्ये पोलिस दलात भरती झाले. त्यांनी शहर वाहतूक शाखा, चंदगड, शिरोली एमआयडीसी, नेसरी, नागरी हक्क संरक्षण, उजळाईवाडी वाहतूक मदत केंद्र आदी ठिकाणी सेवा बजावली आहे. त्यांनी खुनासारख्या सहा गुन्ह्यांमधील संशयितांना अटक करून सुमारे एक कोटी ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याकडे कार्यरत असताना त्यांनी संशयित राजेंद्र बाबर या सराईत गुन्हेगाराला जीव धोक्‍यात घालून संगमनेर येथे रिव्हॉल्व्हरसह पकडले होते. त्यांना २०१३ मध्ये ‘राष्ट्रपतींच्या शौर्यपदका’ने सन्मानित करण्यात आले. चंदगड पोलिस ठाण्यात नेमणुकीस असताना एका रायफल बनविणाऱ्या कारखानदाराकडे काम करून त्याच्याकडून बेकायदा रायफली जप्त केल्या होत्या. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, श्रीनिवास घाटगे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : मतदान केंद्रावर मतदारांचे होणार फूल देऊन स्वागत; टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT