Gas tanker sakal
कोल्हापूर

Kolhapur : गावकमानी जवळ गॅस टँकरचा अपघात ; गॅस गळती सुरूच

बोरपाडळे रोड वाहतूकीस बंद असून आहे.

अनिल एच.मोरे

बोरपाडळे : बोरपाडळे,ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर या गाववेश कमानीजवळ ,भोपतळी भागात रात्री जयगडहून नागपूरकडे जाणारा गॅस टँकर क्रमांक GJ 06 AX 3642 चा अपघात होऊन पलटी झाला.सुदैवाने जीवीतहानी झाली नसली तरी गॅस टँकरची गॅसटाकी लिकेज होऊन गॅस गळती चालू झाल्याने प्रशासनासह सर्वांची तारांबळ उडाली.

वाठार ते कोडोली ते बोरपाडळे पुढे बोरपाडळे फाटा हा रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून बंद करणेत आलेला आहे. बोरपाडळे रोड वाहतूकीस बंद असून आहे. कोणताही अनुचित घटना घडू नये यासाठी याठिकाणी तहसीलदार रमेश शेडगे,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी प्रसाद संकपाळ, आपत्ती व्यवस्थापन महानगरपालिका कोल्हापूरचे दस्तगीर मुल्ला आणि शीतलकुमार डोईजड, सहाय्यक पोलीस निरीक्षक, कोडोली पोलीस स्टेशन आदी अधिकारी रात्रभर याठिकाणी थांबून आहेत.

सध्या 250 मिटर परिसरात गॅस पसरला असल्याचे जिल्हा आपत्ती अधिकारी दस्तगीर मुल्ला यांनी सांगितले.नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे निर्देश जारी केले आहेत.सदर प्रवण क्षेत्रातील नागरिकांना हलवण्यात आले आहे. याठिकाणी यापूर्वीही असे गॅस टँकरचे अपघात झाले असल्याची चर्चा घटनास्थळी होती. कोडोली पोलीस कर्मचारी ,आपत्ती व्यवस्थापनचे जवान यांचा कडक पहारा दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : मोनोरेल बंद, मेट्रोतही तांत्रिक बिघाड; घाटकोपर रेल्वे स्थानकावर उसळली प्रवाशांची गर्दी

'त्या घटनेनंतर मी खूप रडलो होतो' अभिनेता राजकुमार राव स्पष्टच बोलला, म्हणाला, 'आम्हाला काय भावना नाहीत का?'

Latest Maharashtra News Updates : चांदोरीतील गोदावरी नदीपात्राच्या बाहेर पाणी, खंडेराव महाराज मंदिराला पाण्याचा वेढा

Cyber Security : जगभरात चक्क १६ अब्ज पासवर्ड झाले लीक; भारत सरकारने दिला इशारा, तुमचं अकाऊंट सुरक्षित करा एका क्लिकवर..

Beed : कर्ज फेड नाहीतर पत्नीला माझ्या घरी सोड, सावकाराच्या जाचाने दुकानदाराची आत्महत्या; चिठ्ठीत लिहिलं, वर्गणी काढून क्रियाकर्म करा

SCROLL FOR NEXT