Ajit Pawar ncp sabha in Kolhapur  esakal
कोल्हापूर

Kolhapur NCP Sabha : तपोवन मैदानावर धडाडणार अजितदादांची तोफ; कोल्हापुरात रेकॉर्ड ब्रेक सभेचं आयोजन, कधी होणार सभा?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (ता. १०) तपोवन मैदानावर उत्तरदायित्व सभा होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा होणार असून सभेला ‘काम बोलतंय..’ ही टॅगलाईन देण्यात आलीये.

कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (ता. १०) तपोवन मैदानावर उत्तरदायित्व सभा होणार आहे. या सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी दिली.

तपोवन मैदानावर सभास्थळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पाटील म्हणाले, ‘कावळा नाका येथे दुपारी साडेतीनला अजित पवार यांचे छत्रपती ताराराणी पुतळ्याजवळ स्वागत होईल. तेथून ते दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करतील.

तेथून पुढे ऐतिहासिक बिंदू चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यांना अभिवादन करतील. त्यानंतर मिरजकर तिकटीवरून पुढे ही मिरवणूक तपोवन मैदानावर येईल. त्यानंतर सभेला प्रारंभ होईल.’

सभास्थळी पश्चिम बाजूच्या मैदानावर पार्किंगची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सभामंडपामध्ये पूर्व बाजूला पुरुष आणि पश्चिम बाजूला महिला अशी बैठक व्यवस्था असेल. ‘जागो हिंदुस्तानी’ हा राष्ट्रभक्तीपर कार्यक्रमही यावेळी सादर होईल.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, विधानसभा सभापती नरहरी झिरवाळ, रामराजे निंबाळकर, आमदार मकरंद पाटील आदींची उपस्थिती असेल. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा होणार असून सभेला ‘काम बोलतय..’ ही टॅगलाईन दिली असल्याचेही पाटील म्हणाले.

यावेळी शहराध्यक्ष आदिल फरास, स्थायी समितीचे माजी सभापती राजेश लाटकर, जिल्हा दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, महेंद्र चव्हाण, निखिल कोराणे, बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, मनोज फराकटे, विकास पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सभास्थळाला भेट देऊन मैदानाची पाहणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT