पंचगंगा
पंचगंगा  sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषण हा गंभीर प्रश्न आहे

ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर: पंचगंगा नदी आणि उपनद्यांकाठावर असणाऱ्या हॉटेल, यात्री निवास, मंगल कार्यालये यांची संख्या ५५९ आहे. त्यातून दर दिवशी तीन लाख ८९ हजार २९७ लिटर सांडपाणी तयार होते. या सांडपाण्यावर त्याच जागी प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केला पाहिजे. त्यामुळे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावरील ताण कमी होईल. वाढत्या शहरीकरणाबरोबर हॉटेल, यात्री निवास, वाहने दुरुस्त करणारी गॅरेज यांची संख्याही वाढत आहे. यातून रोज हजारो लिटर सांडपाणी तयार होते. शहरातील हॉटेल, यात्री निवास आणि गॅरेजचे सांडपाणी एसटीपी प्रकल्पात प्रक्रियेसाठी जाते; तर ग्रामीण भागातील यांचे सांडपाणी नाल्या-ओढ्यातून नदीत मिसळते किंवा तेथेच मुरविले जाते. हे सांडपाणी जमिनीत मुरणे किंवा नदीत मिसळणे दोन्ही मानवी आरोग्यास घातक आहे. या सांडपाण्यावर प्रक्रिया केली पाहिजे. हे सांडपाणी प्रक्रिया करून पुन्हा वापरता येऊ शकते. गॅरेजचे सांडपाणी प्रक्रिया करून पुन्हा वाहने धुण्यासाठी वापरता येते.

पंचगंगा नदी प्रदूषण हा गंभीर प्रश्न आहे. समाजातील विविध घटक याची उकल करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. शिवाजी विद्यापीठाचा त्यात समावेश आहे. विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र विभाग, भूगोल विभाग, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक नदी प्रदूषणाची समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. या विषयांत विद्यापीठाला जे-जे करणे शक्य आहे, ते-ते सर्वतोपरी आम्ही करीत आहोत.

- डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ

शहरातील हॉटेल्सचे पथदर्शी पाऊल

शहरातील बहुतांश हॉटेल्सनी परिसरात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले आहेत. त्यातून प्रक्रिया केलेले पाणी गटारीत सोडले जाते. या हॉटेल्सनी कचऱ्यापासून खतनिर्मितीही केली. यात्री निवास आणि गॅरेज यांनी हे करणे आवश्यक आहे.

या संस्था होणार सहभागी

पंचगंगा वाचवा मोहिमेत व्हाईट आर्मी, निसर्गमित्र, विज्ञान प्रबोधिनी, हिंदू युवा प्रतिष्ठान, रंकाळा वॉकर्स, अरिहंत जैन फाउंडेशन, दळवीज् आर्टस् इन्स्टिट्यूट, वृक्षप्रेमी ऑर्गनायझेशन, अर्थ वॉरियर्स, कलासाधना मंच, सार्थक क्रिएशन्स, डॉ. आझाद नायकवडी लोककला, सामाजिक, सांस्कृतिक फाउंडेशन, पोलिसमित्र रेस्क्यू फोर्स, राजारामपुरी युवक मित्रमंडळ आदी संस्था सहभागी होणार आहेत. ‘पंचगंगेला वाचविण्यासाठी आम्ही सहभागी होतोय, तुम्ही व्हा’ असे आवाहन त्यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT