bison kolhapur
कोल्हापूर

कोल्हापूर - 30 गव्यांचा कळप दिसला खोतवाडीत

पहिल्यांदाच एवढा मोठा गवांचा कळप दिसल्याने नागरिकांत भिती

सागर चौगले

पहिल्यांदाच एवढा मोठा गवांचा कळप दिसल्याने नागरिकांत भिती

कोल्हापूर - पन्हाळा तालुक्यात आज पुन्हा एकदा गव्यांच्या कळपाचे दर्शन झाले. दिवसाढवळ्या एका पाठोपाठ एक असे 30 हुन अधिक गवे पहायला मिळाले आहेत. (kolhapur News) पहिल्यांदाच एवढा मोठा गवांचा कळप दिसल्याने नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. (Kolhapur Breaking News)

दरम्यान, पन्हाळा तालुक्यातील वाघवे पैकी खोतवाडी या परिसरात गव्यांचे (Bison) दर्शन झाले आहे. राधानगरी- आजरा परिसरातील अभयारण्यात मोठ्या प्रमाणात गवे आहेत. दाजीपूर (Dajipur) हे गव्यांसाठी प्रसिद्ध असणारे अभयारण्य आहे. त्यामुळे अनेकवेळा हे गवे बाहेर पडतात असे वनविभागानेही सांगितले आहे. या भागात वारंवार गव्यांचे दर्शन होते. मात्र यावेळी पन्हाळा तालुक्यात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या कळपाने गवे एकाचवेळी दिसले आहेत. दरम्यान, शेतीचे नुकसान होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी गव्यांना (Bison) जंगलाच्या दिशेने उसकवून लावले आहेत.

पन्हाळा (Panhala) तालुका आणि आजूबाजूच्या परिसरात बऱ्याचवेळा गवे पहायला मिळतात, असे तेथील स्थानिक आणि ग्रमास्थांनी सांगत असतात. मध्यंतही गव्यांच्या कळपांचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले होते. मात्र यावेली गव्यांचा कळप मोठा असून यात सुमारे ३० गवे असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मागील काही दिवसांपूर्वीही असाच एक गवा कोल्हापूर शहरात फिरत होता. मात्र काही दिवसांनी तो पुन्हा जंगलात गेला असल्याची माहिती मिळाली. आता पुन्हा या परिसरात मोठ्या संख्येने गवे फिरत असल्याने ग्रामस्थांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

Latest Marathi News Live Update : कोकणातही दुष्काळाची परिस्थिती; भातपिकाला मोठा फटका

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT