स्वप्न उतरलं सत्यात; सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजला अखेर मान्यता

जिल्ह्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होऊन जिल्ह्यात डॉक्टर घडण्याचे स्वप्न पूर्ण होणार
medical department
medical departmentsakal
Summary

जिल्ह्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होऊन जिल्ह्यात डॉक्टर घडण्याचे स्वप्न पूर्ण होणार

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेचा मार्ग अखेर सुकर झाला आहे. त्यासाठी आवश्यक असलेली कायमची मान्यता मिळाली आहे. परिणामी यावर्षीपासून शंभर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. यामुळे जिल्ह्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होऊन जिल्ह्यात डॉक्टर घडण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. (medical college permission approved in sindhudurg)

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, अशी जिल्हावासीयांची (Sidhudurg News) गेली अनेक वर्षांची मागणी होती. यासाठी निवेदने देणे, पत्र लेखन करून लक्ष वेधणे, अशी आंदोलने करण्यात आली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांचे ठरावही पाठवण्यात आले होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आंगणेवाडी यात्रेनिमित्त जिल्ह्यात आले असता त्यांनी जिल्ह्याच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रशासकीय बैठक घेतली होती. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते.

medical department
काळ वेळ बघून उत्तर देऊ; नितेश राणेंच्या कारवाईवर फडणवीसांची प्रतिक्रिया

राज्य शासनाने त्यानंतर आपल्या स्तरावर जिल्ह्यात असे महाविद्यालय मंजूर करून त्यासाठी आर्थिक तरतूद केली. त्यासाठी स्टाफ पॅटर्न तयार करून तोसुद्धा मंजूर केला होता. यानंतर राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने पाहणी केली. पहिल्या फेरीत पुरेशा सुविधा नसल्याने परवानगी नाकारली होती. दुसऱ्या वेळी पाहणी करून २० सप्टेंबरला परवानगी दिली होती; परंतु अवघ्या दोन दिवसांत परवानगी नाकारण्यात येत त्रुटी दूर करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर तिसऱ्यावेळी पाहणी झाली. त्यावेळी तर आवश्यक डॉक्टर उपलब्ध नव्हते. त्यामुळे समितीने चौथ्यावेळी पाहणी केली. या पाहणीत समितीला आवश्यक सुविधा उपलब्ध दिसल्याने वैद्यकीय महाविद्यालयाला तत्वतः मान्यता देत उणिवा सहा महिन्यांत दूर करण्याची मुदत दिली होती.

याबाबत सुरू अधिवेशनात खासदार विनायक राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे याकडे लक्ष वेधले होते. त्यामुळे समितीने पुन्हा पाहणी करीत आज पूर्ण व कायमची मान्यता दिली आहे. हे वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्यासाठी शासकीय महाविद्यालय कृती समितीने मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत. प्रत्येक स्तरावर या समितीने पाठपुरावा केला आहे. गेल्या दोन वर्षात यासाठी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे अखेर महाविद्यालय विद्यार्थी प्रवेशासह मंजूर झाले आहे.

medical department
महाआघाडीचं स्टेअरिंग ठाकरेंच्या हातात राहील - संजय राऊत

स्वप्न सत्यात उतरले

या वैद्यकीय महाविद्यालयात १०० विद्यार्थ्यांची क्षमता आहे; परंतु अलीकडे मान्यतेची प्रक्रिया रखडल्यामुळे यावर्षी विद्यार्थी प्रवेशाचे स्वप्न धूसर झाले होते. आज कायम मान्यता मिळाल्यामुळे स्वप्न सत्यात उतरले असून, यावर्षी १०० विद्यार्थी प्रवेश घेणार आहेत.

'सकाळ'चे पाठबळ

सिंधुदुर्गात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, अशी संकल्पना सगळ्यात आधी 'सकाळ'ने मांडली. जिल्ह्यात सुसज्ज शासकीय रुग्णालय नाही. यामुळे जिल्ह्यावासीयांना गोव्याला अवलंबून राहावे लागते. वैद्यकीय महाविद्यालय झाल्यास येथे सुसज्ज रुग्णालय होईल, अशी ही संकल्पना होती. ती 'सकाळ'च्या माध्यमातून वारंवार प्रभावीपणे मांडली गेली. यातून कृती समिती स्थापन होऊन जनरेटा उभा राहिला. याला 'सकाळ'ने माध्यम म्हणून पाठबळ दिले. यातून आज वैद्यकीय महाविद्यालयाला अंतिम मान्यता मिळाली. सकारात्मक पत्रकारितेतून जनतेला दिलासा मिळाल्याच्या भावना आज अनेकांनी 'सकाळ'शी संपर्क साधून दिल्या.

medical department
Nitesh Rane News : सिंधुदुर्गात दहशत चालणार नाही; राणेंना इशारा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com